Join us

"काय यार, हे असलं माझं काम नाही...", रोहितनं पत्रकाराची घेतली फिरकी; नेमकं घडलं काय?

 icc odi world cup 2023 : उद्यापासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 15:44 IST

Open in App

अवघं क्रिकेट विश्व ज्या क्षणाच्या प्रतिक्षेत होतं तो क्षण अखेर आला असून वन डे विश्वचषक सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. उद्यापासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होत आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. आज या स्पर्धेच्या तोंडावर 'कॅप्टन्स डे'च्या माध्यमातून सर्व संघाच्या कर्णधारांनी आपापली रणनीती आणि मतं मांडली. या कार्यक्रमात भारतीय कर्णधार रोहित शर्माला पत्रकाराने एक भन्नाट प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना हिटमॅनने पत्रकाराची फिरकी घेतली अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

दरम्यान, उद्या गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. याबद्दल बोलताना पत्रकाराने रोहितला एक अनोखा प्रश्न विचारला. "२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेचे विजेते म्हणून इंग्लंडची घोषणा करण्यात आली. तो सामना अनिर्णित राहिला मग सुपर ओव्हर खेळवली तरीदेखील सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना विजेते घोषित करायला हवे होते असे तुला वाटत नाही का?" हा प्रश्न ऐकताच रोहितचे हावभाव पाहण्यासारखे होते. पत्रकाराला त्याच शैलीत उत्तर देताना रोहितने म्हटले, "काय यार, विजेत्यांची घोषणा करणे हे माझे काम नाही, घोषित करणं हे सगळं आमचं काम नाही."

वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

वन डे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्मासोशल व्हायरलइंग्लंडआॅस्ट्रेलिया