भारतीय संघातील स्टार खेळाडूंनी आगामी हंगामाआधी बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्स (COE) मध्ये फिटनेस टेस्ट दिली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी-२० आणि कसोटी क्रिकेमधून निवृत्तीनंतर बराच काळ क्रिकेटच्या मैदानातून दूर असलेल्या रोहित शर्मानंही फिटनेस टेस्ट दिली असून तो या टेस्टमध्ये पासही झालाय. आता चर्चा रंगतीये ती विराट कोहलीची. तो सध्या लंडनमध्ये असून लवकरच तोही फिटनेस टेस्टसाठी बंगळुरुला येईल, अशी अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टेस्टमध्ये सर्वात बेस्ट ठरला हा गोलंदाज
रोहित शर्माशिवाय भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर फिटनेस यांनी फिटनेस टेस्ट दिली अन् ते उत्तीर्णही झाले. यो-यो (Yo-Yo) टेस्टशिवाय हाडांच्या मजबूतीसाठी DXA स्कॅनही करण्यात आले. या टेस्टमध्ये प्रसिद्ध कृष्णा सर्वात अव्वल ठरल्याची माहितीही समोर आलीये.
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?
भारत 'अ' संघाकडून मैदानात उतरणार ही जोडी
खरंतर विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वात फिट खेळाडू आहे. पण बीसीसीआयच्या नियमानुसार, बराच काळ क्रिकेटपासून दूर असल्यामुळे त्यालाही ही टेस्ट द्यावीच लागेल. रोहित प्रमाणे विराट कोहली हा देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडे खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ही जोडी पुन्हा मैदानात उतरेल. रोहित फिट ठरल्यावर आता कोहली या फिटनेस टेस्टमध्ये किती गुण मिळवणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. तो कधी फिटनेस टेस्ट देणार? ते अद्याप समोर आलेले नाही. पण सध्याच्या घडीला जी माहिती समोर येतीये, त्यानुसार रोहित आणि विराट दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारत 'अ' संघाकडून घरच्या मैदानात रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेणार आहेत.
या मालिकेआधीच होऊ शकते विराटची फिटनेस टेस्ट
भारत 'अ' संघ घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ३० सप्टेंबर, ३ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर रोजी कानापूरच्या मैदानात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याआधीच विराट कोहली फिटनेस टेस्टला सामोरे जाईल, असे वाटते.
Web Title: Rohit Sharma Faces Fitness Test Ahead of Asia Cup 2025 Virat Kohli’s Absence Raises Big Questions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.