IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अखेर सूर गवसला आहे. आयपीएल २०२४ मध्ये सलग ३ पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखालील MI ने वानखेडे स्टेडियमवरील सलग दोन सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात मोठ्या लक्षाचा सहज पाठलाग केल्यानंतर मुंबईचे चाहते आनंदीत झाले. पण, अजूनही रोहित शर्माने संघाचे नेतृत्व पुन्हा सांभाळावे अशी अनेकांची इच्छा आहे. अशा चाहत्यांसाठी रोहितचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि रोहितने मुंबई इंडियन्सच्या बसचं स्टेअरिंग हाती घेतलं आहे.
रोहित मैदानावर व मैदानाबाहेर अनेकदा सहकाऱ्यांची मजा मस्करी करताना दिसला आहे. RCB विरुद्धच्या सामन्यात रोहित व दिनेश कार्तिक यांच्यातला संवाद चांगलाच व्हायरल झाला होता. या सामन्यात RCB च्या कार्तिकने MI च्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याचवेळी स्लीपमध्ये उभा असलेला रोहित त्याची फिरकी घेताना दिसला.. वर्ल्ड कप खेलना है, इसको... अशी फिरकी रोहितने घेतली. आता रोहितचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि तो मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या बसच्या ड्रायव्हिंस सिटवर बसलेला पाहायला मिळतोय..
मागील वर्षी भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवावर रोहितने उघडपणे भाष्य केले. त्याने सांगितले की, आम्ही ज्या लयनुसार खेळत होतो ते पाहता आमचा पराभव होईल असे वाटत नव्हते. अंतिम सामन्यात आमचा दिवसच खराब होता असे म्हणावे लागेल. तसेच ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. मला आणखी काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. मी आताच्या घडीला निवृत्तीबद्दल विचार करत नाही. पण, मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. आगामी काळात होणारी २०२५ ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आम्ही जिंकू अशी आशा आहे. मला आशा आहे की, हे सर्व करण्यात भारतीय संघाला यश मिळेल.