Join us

Video: 'बाबा कोरोना पॉझिटिव्ह आहेत'; रोहित शर्माच्या मुलीचे बोबडे बोल, नेटिझन म्हणाले कित्ती गोssड!

रोहितच्या लेकीने दिलेल्या निरागस उत्तरावर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 09:51 IST

Open in App

Rohit Sharma Daughter Viral Video ENG vs IND: भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रोहित शर्माचे लाखो चाहते खूप चिंतेत आहेत. रोहित शर्मा १ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटीत खेळणार की नाही हे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलेले नाही. तरीही, रोहितचा थंम्प अप करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगले संकेत देताना दिसत आहे. याचदरम्यान, रोहितची मुलगी समायरा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आई रितिका आणि नैनीसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे.

समायरा आपल्या आईसोबत हॉटेलमधून बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ असते. त्यावेळी तेथे बसलेला एक जण समायराला प्रश्न विचारतो - "तुझे वडील कुठे आहेत". तो प्रश्न ऐकताच समायरा थांबते आणि हसते. मग ती अगदी निरागसपणे उत्तर देते - "बाबा त्यांच्या रूममध्ये आहेत. बाबा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे फक्त एका माणसाला परवानगी आहे." समायराच्या या निरागस व्हिडीओने सोशल मीडियावर चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि शेअर मिळत आहेत. पाहा व्हिडीओ-

रोहितच्या मुलीची स्टाइल निरागसतेने भरलेली आहे. या चिमुकलीच्या उत्तरातून तिचे संगोपन आणि शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे स्पष्टपणे दिसून येते अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. समायराच्या स्टाईलवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मासोशल व्हायरलसोशल मीडिया
Open in App