Join us

Rohit Sharma Comedy Video, IPL 2022 MI vs LSG Live: एक टप्पा आऊट? Mumbai Indians चा कर्णधार रोहितने झेल पकडला अन् केलं जोरदार अपील! पाहा मैदानावर घडलेला मजेशीर प्रसंग

रोहितने नक्की काय केलं पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:03 IST

Open in App

Rohit Sharma Comedy Video, IPL 2022 MI vs LSG Live: रोहित शर्माच्यामुंबई इंडियन्सला (mumbai Indians) आजचा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकडून फॅबियन अॅलनला संघात खेळवण्यात आले. लखनौने देखील संघात एक बदल केला. सामन्यात मनिष पांडे आणि लोकेश राहुल जोडीने मुंबईच्या गोलंदाजांची हवाच काढून टाकली. त्यामुळे मुंबईचे समर्थक निराश झाले होते. त्यावेळी रोहित शर्माच्या कृतीने साऱ्यांनाच काही काळ हासायला भाग पाडले.

रोहित शर्माने लखनौ संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. त्यांची सुरूवात चांगली झाली. क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली होती. पण मुंबई इंडियन्सच्या फॅबियन अँलनने त्याला २४ धावांवर बाद केले. त्यानंतर मनिष पांडेच्या साथीने लोकेश राहुलने डाव पुढे नेला. त्याच दरम्यान रोहितने एक टप्पा झेल घेत प्रेक्षकांकडे बघून जोरात अपील केले. त्यानंतर प्रेक्षकांनीही आवाज केला आणि स्टेडियममध्ये काही वेळ ऊर्जा संचारली. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, त्यानंतर मनिष पांडे २९ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (क), इशान किशन (डब्ल्यू), देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स

लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सलोकेश राहुल
Open in App