Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव

हिटॅमन रोहित शर्मानं साधला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 18:08 IST

Open in App

Rohit Sharma Record Hitting Most Sixes By Indian Player Against One Team In IPL : भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या IPL मधील दुसऱ्या सामन्यात छोट्याखानी खेळीत मोठा विक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्मानं दुसऱ्या सामन्यात २६ चेंडूत  ३५ धावांची उपयुक्त खेळी करताना एक उत्तुंग षटकार मारला. या षटकारासह त्याने IPL मध्ये एका फ्रँचायझी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हिटॅमन रोहित शर्मानं साधला मोठा डाव

३८ वर्षीय उजव्या हाताच्या बॅटरनं दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो यंदाच्या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक झळकावण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत असताना अक्षर पटेलनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. नितीश राणा याने त्याचा सर्वोत्तम झेल टिपला. पण त्याआधी हिटमॅन रोहितच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली होती. IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहचला आहे.

Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली

MS धोनीचा विक्रम मोडला

याआधी हा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावे होता. MS धोनीनं आपल्या आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सर्वाधिक ५० षटकार मारले होते. हिटमॅन रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विराज निगमच्या गोलंदाजीवर ५१ वा षटकार मारतनवा विक्रम प्रस्थापित केला. 

गेलच्या नावे आहे सर्वकालीन रेकॉर्ड    IPL मधील भारतासह परदेशी खेळाडूंचा विचार केला तर एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. गेलनं पंजाब किंग्स विरुद्ध १६ सामन्यांत ६१ षटकार ठोकले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या त्याच्या खात्यात १९ सामन्यांत ५४ षटकारांची नोंद आहे.  

IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • ६१ - ख्रिस गेल विरुद्ध पंजाब किंग्स 
  • ५४ - ख्रिस गेल विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
  • ५१ - रोहित शर्मा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 
  • ५० - एमएस धोनी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 
  • ४८ - विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स 
  • ४७ - रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 
English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma breaks Dhoni's record, hits most sixes against Delhi.

Web Summary : Rohit Sharma surpassed MS Dhoni's record for most sixes against a single IPL team. He hit his 51st six against Delhi Capitals, becoming the top Indian player in this feat. Chris Gayle holds the overall record with 61 sixes.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सरोहित शर्मामहेंद्रसिंग धोनी