Join us

Rohit Sharma Most Runs in T20 Cricket, IND vs SL 1st T20 : मुंबईचा 'हिटमॅन' जगात भारी! गोलंदाजांना जोरदार चोप देत रोहित शर्माने केला World Record

रोहितने विराट कोहली आणि मार्टीन गप्टील यांना मागे टाकलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:19 IST

Open in App

Rohit Sharma, Most Runs in T20 Cricket, IND vs SL 1st T20 : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच टी२० सामन्यात तुफान फटकेबाजी करत विश्वविक्रम (World Record) रचला. रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३ हजार ३०० धावांचा टप्पा पार केला. त्यासोबतच रोहितने टी२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचाही विश्वविक्रम आपल्या नावे केला. रोहितने सामन्यात ३७ धावांचा टप्पा ओलांडताच हा पराक्रम केला.

रोहित शर्मा हा जेव्हा मैदानात आला तेव्हा रोहितच्या नावावर ३ हजार २६३ आंतरराष्ट्रीय धावा होत्या. या यादीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील ३ हजार २९९ धावांसह अव्वल स्थानी होता. तर भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली हा ३ हजार २९६ धावांसह दुसऱ्या स्थानी होता. पण रोहितने मात्र डावाच्या नवव्या षटकात ३७ धावा केल्या आणि ३ हजार ३०० धावांचा टप्पा पार केला.

रोहितचं अर्धशतक मात्र हुकलं...

रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांनी डावाची झंजावाती सुरूवात केली. इशान किशनने वेगवान खेळ करत सहज अर्धशतक ठोकलं. रोहितने देखील दमदार फलंदाजी करायची सुरूवात केली होती. पण रोहितला लाहिरू कुमारा याने स्मार्ट गोलंदाजी करत त्रिफळाचीत केलं. ३२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत ४४ धावांवर रोहित बाद झाला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माविराट कोहलीटी-20 क्रिकेट
Open in App