Join us

IND vs SL, Rohit Sharma: रोहित शर्माने मुंबईत सराव सत्राला लावली हजेरी; श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार?

भारतीय संघ 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:10 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता संघाला मायदेशात ट्वेंटी-20 मालिका खेळायची आहे. खरं तर श्रीलंकेचा संघ नववर्षात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळवली जाईल. मात्र, या आधी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माने चांगले संकेत दिले आहेत. अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रोहितने मुंबईत नेटवर फलंदाजीचा सराव केला. 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत खेळणार? दरम्यान, रोहित शर्माला बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. परंतु आता बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो जानेवारीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर रविवारी सकाळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नेटमध्ये फलंदाजी केली. त्यानंतर तो मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्येही आला. अशी माहिती कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली. 

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 

  •  3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  •  5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  • 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघमुंबईबीसीसीआय
Open in App