रोनाल्डोच्या गौप्यस्फोटानंतर 'हिटमॅन' रोहित चिडला, थेट माद्रिदला सवाल

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे जगभरात चाहते आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:53 IST2018-10-30T15:52:48+5:302018-10-30T15:53:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
rohit sharma ask question to real madrid president after cristiano ronaldo claim | रोनाल्डोच्या गौप्यस्फोटानंतर 'हिटमॅन' रोहित चिडला, थेट माद्रिदला सवाल

रोनाल्डोच्या गौप्यस्फोटानंतर 'हिटमॅन' रोहित चिडला, थेट माद्रिदला सवाल

मुंबई : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे जगभरात चाहते आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांचाही समावेश आहे. त्यामुळेच रोनाल्डोने रेयाल माद्रिद क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना धक्का बसला. 2009 पासून रोनाल्डो माद्रिद क्लबकडून खेळत आहे आणि त्याने माद्रिदला सलग तीनवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. तरीही रोनाल्डोने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना धक्का बसला. मात्र, या निर्णयामागचे खरे कारण रोनाल्डोने सांगितले.

( माद्रिदला माझ्यापासून फक्त पैसा कमवायचा होता, रोनाल्डोचा गौप्यस्फोट )

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माने रोनाल्डोच्या गौप्यस्फोटाचा आधार घेत रेयाल माद्रिद क्लबच्या अध्यक्षांना सवाल केला आहे. माद्रिदला सोडचिठ्ठी देण्यामागचे खरे कारण रोनाल्डोने सांगितले. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेंटीनो पेरेझ यांना माझ्या नावाचा वापर करून फक्त पैसा कमवायचा होता. ते फक्त माझ्याकडे व्यवसाय संबंधातून पाहायचे आणि मला ते माहित होते. त्यामुळे मी माद्रिद सोडल्यानंतर त्यांनी जो काही भावनिक आव आणला तो मनापासून नव्हता, असा गौप्यस्फोट रोनाल्डोने फ्रान्स फुटबॉलला दिलेल्या एका मुलाखतीत केला. रोहितने हाच धागा पकडून पेरेझ यांना असे तुम्हा का केलेत, हा प्रश्न विचारला. 


Web Title: rohit sharma ask question to real madrid president after cristiano ronaldo claim