Join us

रोहित शर्माच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा; जगातला मिळाला मोठा बहुमान

रोहित हा फुटबॉलचा चाहता आहे. झिनेदिन झिदान हा रोहितचा सर्वात आवडता फुटबॉलपटू आहे. आता एका फुटबॉलच्या मोठ्या लीगने सन्मानित केल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 17:43 IST

Open in App

मुंबई : भारताचा उप कर्णधार रोहित शर्माच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रोहितला जगातील मोठा बहुमान यावेळी मिळाल्याचे पाहायला मिळाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात ४०० षटकार ठोकण्याचा इतिहास रचला होता. कारण यापूर्वी भारताच्या एकाही फलंदाजाला ४०० षटकार खेचता आलेले नाहीत.

रोहित हा फुटबॉलचा चाहता आहे. झिनेदिन झिदान हा रोहितचा सर्वात आवडता फुटबॉलपटू आहे. आता एका फुटबॉलच्या मोठ्या लीगने सन्मानित केल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित हा ला लिगा फुटबॉल लीग रीयाल माद्रीदचा भारतातील सदिच्छादूत बनवण्याच आले आहे. या लीगचा फुटबॉपटू सोडून अन्य खेळांचा सदिच्छादूत झालेला रोहित हा पहिला खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात एक इतिहास रचला आहे. रोहितने या सामन्यात आपला ४००वा षटकार लगावला. आतापर्यंत एकाही भारताच्या खेळाडूला ४०० षटकार लगावता आलेले नाहीत.

टॅग्स :रोहित शर्माफुटबॉलभारत