Join us

सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यालाही मिळणार 'हा' सन्मान?

Rohit Sharma and Virat Kohli Jersey News: टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:17 IST

Open in App

भारताच यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० नंतर लगेच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली. पंरतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांनाच हा सन्मान मिळाला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. रोहित शर्मा हा ४५ क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली १८ क्रमाकांची जर्सी घालतो. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात दोघांनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून जर्सी क्रमांक ४५ आणि जर्सी क्रमांक १८ निवृत्त होतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनाच हा सन्मान मिळाला आहे. सर्वात प्रथम बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्यानंतर धोनीची ७ क्रमांकाची जर्सी  कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी २०१७ मध्ये निवृत्त झाली.  महेंद्रसिंह धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बीसीसीआयने ७ क्रमांकाची जर्सी देखील निवृत्त केली. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला या दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंक्तीत स्थान मिळेल का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

आयपीएलनंतर भारताचा इंग्लंड दौराआयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डरोहित शर्माविराट कोहलीसचिन तेंडुलकरमहेंद्रसिंग धोनी