Join us

Robin Uthappa Mumbai Indians, IPL: "मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर..."; रॉबिन उथप्पाचा धक्कादायक खुलासा

रॉबिन उथप्पाने मुलाखतीत सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:21 IST

Open in App

Robin Uthappa Mumbai Indians, IPL: भारतीय क्रिकेट संघातील एकेकाळचा पॉवर हिटर फलंदाज रॉबिन उथप्पा सध्या IPL 2022 चांगलंच गाजवतोय. चेन्नईच्या संघाकडून यंदाच्या हंगामात त्याला भरपूर संधी दिली जातेय. आणि तोदखेली संधीचं सोनं करतोय. उथप्पा चेन्नईच्या आधी बरेच वर्ष कोलकाता संघाकडून, मग राजस्थानकडून खेळला. त्याआधी सुरुवातीला तो मुंबई इंडियन्सकडून आणि बंगळुरू संघाकडूनही खेळला. याच सुरूवातीच्या काळातील एक धक्कादायक खुलासा रॉबिन उथप्पाने केला.

भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या यू ट्युब चॅनेलवर रॉबिन उथप्पाने त्याच्याबरोबर घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला. "मी, मनिष पांडे आणि जहीर खान आम्ही एकत्र होतो. त्यावेळी मला माहिती होती की खेळाडू ट्रान्सफर होण्याच्या यादीत माझं नाव पहिलं आहे. माझ्यासाठी मुंबईचा संघ सोडून दुसऱ्या संघात जाणं खूपच वेदनादायी होतं. कारण मी मुंबईच्या संघाशी एकनिष्ठ होतो. अशा वेळी IPL सुरू होण्याच्या एक महिना आधी मला ट्रान्सफरच्या कागदांवर सही करण्यास सांगितलं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात फारच विचित्र मनस्थितीत होतो. त्यातच मला मुंबई इंडियन्समधील कोणीतरी सांगितलं की तुला या पेपर्सवर सह्या कराव्याच लागतील नाही तर तुला मुंबईच्या संघात प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही."

"बंगळुरू संघाकडून खेळताना मी खूपच डिप्रेशन मध्ये होतो. त्यामुळे मला बंगळुरूतून फारसं चांगलं खेळता आलं नाही. एका सामन्यात मला बाहेर करण्यात आलं. त्यानंतरच्या सामन्यात माझी जागा टिकवण्यासाठी मी चांगला खेळलो. पण तरीही मी मानसिकदृष्ट्या काहीसा खचलो होतो", असंही उथप्पा म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सआर अश्विनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App