Rob Key To Investigate England’s Stag Do Drinking Habits On Noosa Mid Ashes Break : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंड क्रिकेटपटूंच्या मद्य सेवनाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर सराव करण्याऐवजी तिसऱ्या कसोटी सामन्याआधी संघातील खेळाडूंनी ब्रेक घेतला. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथील समुद्रकिनाऱ्यावर वसेलेल्या नूसा रेसॉर्टमध्ये रंगलेल्या पार्टीत 'पेग वर पेग...'असा खेळ चालला. या गोष्टीची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यावर आता इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विश्रांतीवर आक्षेप नाही, पण अति मद्यपान केले असेल तर...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेदरम्यान विश्रांतीच्या काळात संघातील खेळाडूंनी अति मद्यसेवन केल्याच्या बातम्यांची चौकशी केली जाईल, असे रॉब की यांनी म्हटले आहे. दुसऱ्या कसोटीनंतर तिसऱ्या कसोटीपूर्वी मिळालेल्या ब्रेकदरम्यान इंग्लंड संघाने ब्रिस्बेनच्या उत्तरेला असलेल्या नूसा या शहरातील एका रिसॉर्टमध्ये चार रात्री घालवल्या. हा ब्रेक त्यांच्या नियोजित कार्यक्रमाचाच भाग होता. खेळाडूंनी घेतेलल्या विश्रांतीसंदर्भात कोणताही आक्षेप नाही. पण जर त्यांनी अति मद्यपान केल्याचे पुरावे आढळले तर त्याची चौकशी नक्की केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
चौकशी करण्याची तयारी दाखवली, पण खेळाडूंची बाजूही मांडली
ते पुढे म्हणाले, “कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट संघाकडून अशाप्रकारच्या अतिरेकाची अपेक्षा नसते. तिथे नेमके काय घडले याची चौकशी न करणे ही माझी चूक ठरेल. मात्र, आतापर्यंत मला जे ऐकायला मिळाले आहे, त्यानुसार खेळाडूंचे वर्तन चांगलेच होते. त्यांनी एकत्र बसून दुपारचे आणि रात्रीचे जेवण केले. ते उशिरापर्यंत बाहेर फिरले नाहीत. थोडेफार मद्यपान झाले, याला माझी हरकत नाही. पण जर अतिरेक झाला असेल तर हा नक्कीच एक गंभीर मुद्दा ठरेल.”