Join us

क्रिकेटचे दिग्गज मैदानावर परतणार; 5 फेब्रुवारीला सुरु होणार 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज'

पहिला सामना भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होईल, तर 12 मार्चला भारत-पाक आमनेसामने येतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:24 IST

Open in App

नवी दिल्ली: लवकरच आपल्या सर्वांना निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा सीझन-2 सुरू होत आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती(UAE) मध्ये ही सीरिज खेळवली जाईल. भारतात या T-20 लीगची सुरुवात 5 फेब्रुवारी 2022 पासून, तर 1 मार्चपासून UAE मध्ये होईल. तसेच, सीजनचा अंतिम सामना 19 मार्च रोजी होईल. 

UAEकडून मिळाली एनओसीया रोड सेफ्टी लीगचा उद्देश लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्मण करणे आहे. MSPL आणि ANZA इन्वेस्टमेंट ग्रुपकडून या सीरिजचे आयोजन केले जाते. संयुक्त अरब अमीरात क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. ANZA इन्वेस्टमेंट ग्रुपला आयोजकांनी मेगा इव्हेंटसाठी एनओसी जारी केली आहे. ANZA इन्वेस्टमेंट ग्रुप हायनेस शेख हमदान बिन मोहम्मद अलनाहयान यांची कंपनी आहे.

भारत-पाक आमनेसामनेयंदाच्या मोसमात इंडिया लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, न्यूझीलंड लीजेंड्स, पाकिस्तान लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स हे संघ सहभागी होणार आहेत. पहिला सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. तर, भारत आणि पाकिस्तानचा संघ 12 मार्चला यूएईमध्ये आमनेसामने येणार आहेत.

पहिल्या सीजनमध्ये भारताचा विजयगेल्या वर्षी या लीगचा पहिला सीझन झाला होता. पहिल्याच सीजनमध्ये भारतीय संघ विजयी झाला होता. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण इत्यादी खेळाडून भारताकडून खेळले होते. तसेच, क्रिकट जगतातील दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स, कार्ल हूपर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, ब्रेट ली अशा खेळाडूंचाही समावेश होता.

टॅग्स :रस्ते सुरक्षासचिन तेंडुलकरसंयुक्त अरब अमिराती
Open in App