Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मिलरच्या अवतीभवती फिरताना दिसली अन्.... आरजे Princy Parikh नं शेअर केला भयावह अनुभव

खुद्द प्रिन्सी पारेखनं यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:34 IST

Open in App

RJ Princy Parikh Deletes Viral T20 World Cup Reel With David Miller : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ च्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचे टेन्शन वाढवले आहे. दरम्यान भारतीय संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा हिरो ठरलेल्या डेविड मिलरच्या अवतीभवती फिरत खास रिल केल्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रिन्सी पारिख नेटकऱ्यांच्या  निशाण्यावर आली आहे. अतिशय वाईट पद्धतीने ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह शब्दांतीव धमक्यांचा सामना करावा लागल्यामुळे तिने डेविड मिलरसोबतचा तो व्हिडिओ फेसबुकवरुन डिलिट केला आहे. खुद्द प्रिन्सी पारेखनं यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

मिलरसोबतच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ट्रोल

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ मधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात डेविड मिलरनं किलर अर्धशतकी खेळीसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयात मोलाटा वाटा उचलला होता. सामन्यानंतर आरजे आणि सोशल मीडियावरील चर्चित चेहरा असलेल्या प्रिन्सी पारेखनं दक्षिण आफ्रिकेच्या स्टारसोबत एक रील तयार केली. "डेविड मिलर हा जबरदस्त खेळाडू आहे. मला वाटलं आपण मित्र आहोत डेविड" या कॅप्शनसह शेअर केलेल्या व्हिडिओत प्रिन्सी स्लो-क्लॅप करत मिलरच्या भवती फिरताना दिसते. तिने मजेशीर अंदाजात तयार केलेल्या या रीलवर काही नेटकऱ्यंनी तिखट प्रतिक्रिया देताना आक्षेपार्ह कमेंट करत तिला ट्रोल केले. एवढेच नाहीतर काहींना सर्व मर्यादा ओलांडून तिला लैंगिक अत्याचाराची धमकीही देण्यात आली.

भयावह अनुभव शेअर करताना काय म्हणाली प्रिन्सी? 

मिलरसोबत शेअर केलेल्या व्हिडिओनंतर आलेला भयावह अनुभव शेअर करताना प्रिन्सी पारिख हिने इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय की,  हा प्रकार फक्त टीका करण्यापर्यंत पर्यंत मर्यादित नव्हता. बॉडी-शेमिंग कमेंट्स आणि आक्षेपार्ह मेसेजमुळे मानसिक त्रास झाला. याप्रकरणात पोलिसांत तक्रार करण्याची गोष्टही तिने शेअर केली आहे. 

इरफान पठाणनेही केलं होतं मिलरच्या किलर खेळीच कौतुक

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर इरफान पठाण यानेही सामन्यानंतर डेविड मिलरच्या  खेळीच कौतुक केले होते. आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये इरफान पठाण म्हणाला होता की, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुरुवातीला तीन विकेट्स गमावल्या. जसप्रीत बुमराह कमलीची गोलंदाजी करत असताना मिलरनं आपला अनुभव दाखवून देत संघाला गरज असताना आश्वासक खेळी केली.  त्याच्याशिवाय डेवॉल्ड ब्रेविसची ४५ धावांच्या खेळी निर्णायक ठरल्याचा उल्लेखही भारतीय क्रिकेटरनं केले होता.   

English
हिंदी सारांश
Web Title : RJ Princy Parikh faces backlash after reel with David Miller.

Web Summary : RJ Princy Parikh faced severe trolling and threats after posting a reel with cricketer David Miller. She deleted the video due to abusive comments. Irfan Pathan praised Miller's match-winning innings against India in the T20 World Cup.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाव्हायरल व्हिडिओऑफ द फिल्ड