रियान परागच्या सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे का होत्या? त्याच्याच तोंडून ऐका उत्तर

Riyan Parag, Sara Ali Khan Ananya Panday : यूट्युब सर्चमध्ये या दोन अभिनेत्रींबद्दल नेमकं काय सर्च करत होता रियान, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:15 IST2025-02-11T17:07:53+5:302025-02-11T17:15:12+5:30

whatsapp join usJoin us
Riyan Parag clarifies on Sara Ali Khan Hot Ananya Panday Hot Youtube Search History Controversy | रियान परागच्या सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे का होत्या? त्याच्याच तोंडून ऐका उत्तर

रियान परागच्या सर्च हिस्ट्रीमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे का होत्या? त्याच्याच तोंडून ऐका उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Riyan Parag, Sara Ali Khan Ananya Panday : टीम इंडियाचा युवा खेळाडू रियान पराग हा IPL दरम्यान खूप चर्चेत असतो. पण त्याशिवाय गेल्या वर्षी तो एका वेगळ्या कारणासाठीही चर्चेत आला होता. ते कारण म्हणजे बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान. रियान परागची यूट्युब हिस्ट्री व्हायरल झाली होती, ज्यामध्ये त्याने सारा अली खान आणि अनन्या पांडे यांची नावे सर्च केली होती आणि त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले. पण आता रियान परागने या वादावर आपले मौन सोडले आहे.

संपूर्ण वाद काय होता?

आयपीएल २०२४ नंतर रियान परागच्या गेमिंग सेशनचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. रियान पराग लाईव्ह स्ट्रीमिंग करताना कॉपी-फ्री संगीत शोधत होता. पण या काळात तो त्याची स्क्रीन लपवायला विसरला. त्याच्या सर्च लिस्टमध्ये सारा अली खान हॉट आणि अनन्या पांडे हॉट असे शब्द लिहिलेले दिसले. त्यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आले आणि त्याची खूप खिल्ली उडवण्यात आली. आता या वादावर रियान परागने सिटी १०१६ रेडिओ स्टेशनशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाला रियान पराग?

रियान पराग म्हणाला, "मी आयपीएलचा एक सामना संपवला आणि चेन्नईमध्ये आलो. सामना संपल्यानंतर मी माझ्या स्ट्रीमिंग टीमसोबत डिस्कॉर्ड कॉल केला आणि तो व्हायरल झाला. खरं तर ही गोष्ट आयपीएलच्या आधीच झाली होती पण ते नंतर व्हायरल केलं गेलं. माझ्या डिस्कॉर्ड टीममधील एका माणसाने मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लगेचच नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पण आयपीएलनंतर, मी पुन्हा स्ट्रीमिंग सुरु केले. तेव्हा माझ्याकडे स्पॉटीफाय किंवा अ‍ॅपल म्युझिक नव्हते. सर्व काही अनइंस्टॉल केलेले होते. म्हणून मी गाणी ऐकण्यासाठी YouTube वर गेलो आणि गाणी शोधली. पण मला कळत नव्हतं नेमकं काय चालू आहे. आणि माझं स्ट्रीमिंग संपताच मला कळलं की हे असं काहीतरी व्हायरल झालंय. मी त्यावेळी याबाबत काहीही स्पष्टीकरण देत बसलो नाही. मला ते फार महत्त्वाचं वाटलं नाही"


दरम्यान, रियान पराग त्यानंतर टीम इंडियातूनही खेळला. तेथे त्याने चांगली कामगिरी केली. आता तो IPL 2025 मध्येही खेळताना दिसणार आहे.

Web Title: Riyan Parag clarifies on Sara Ali Khan Hot Ananya Panday Hot Youtube Search History Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.