नवी दिल्ली : युवा खेळाडू ऋषभ पंत याने त्याच्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज असल्याचे मत भारताच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले.
२० वर्षांच्या ऋषभ याने ओव्हल कसोटीत शानदार शतक केले. मात्र यष्टींच्या मागे त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.
प्रसाद यांनी सांगितले, की ‘ऋषभने इंग्लंडमध्ये मागच्या कसोटीत ज्या पद्धतीने फलंदाजी केली. त्यामुळे मी आनंदी आहे. तो चांगला फलंदाज आहे. यात शंका नाही. मात्र यष्टिरक्षणामुळे मी चिंतित आहे. त्याला आता तीन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने याबाबत लक्ष्य देऊन सुधारणा करण्याची गरज आहे.’