Join us

हार्दिक पंड्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेल्या 'या' सेलिब्रेटीबरोबर रिषभ पंतचं अफेअर

हे दोघे जुहू येथील इस्टेला या हॉटेलमध्ये रात्री अकरा वाजता स्पॉट झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:22 IST

Open in App

मुंबई : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची मैदानात चागंली कामगिरी होताना दिसत नाही. पण दुसरीकडे अफेअरच्या खेळपट्टीवर पंत चांगलाच तळपताना दिसत आहे. हार्दिक पंड्याबरोबर एक सेलिब्रेटी रिलेशनशिपमध्ये होती, त्याच अभिनेत्रीबरोबर आता रिषभ पंतचे अफेअर सुरु आहे, अशी चर्चा सुरु आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना वानखेडेवर झाला. भारतीय संघा १० डिसेंबरला मुंबईत होता. याच दिवशी पंत आणि ही सेलिब्रेटी एका हॉटेलमध्ये डिनरला गेल्याची चर्चा सुरु झाली. हे दोघे जुहू येथील इस्टेला या हॉटेलमध्ये रात्री अकरा वाजता स्पॉट झाले होते, अशी बातमी 'स्पॉटबॉय'ने दिली आहे.

गेल्या वर्षी एका पार्टीमध्ये या सेलिब्रेटीबरोबर हार्दिकची ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे डेटिंग करत होता. या दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण सध्याच्या घडीला या सेलिब्रेटीबरोबर पंतचे नाव जोडले जात आहे. आता ही सेलिब्रेटी कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल.

हार्दिकनंतर आता पंतबरोबर अफेअर करत असलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे उर्वशी रौतेला. पागलपंती या सिनेमामध्ये तिला साऱ्यांनीच पाहिले आहे.

टॅग्स :रिषभ पंतहार्दिक पांड्याउर्वशी रौतेला