लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण...

आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आलीये. कारण पंतची गर्लफ्रेंड नणंद  साक्षीच्या लग्नात अगदी तोऱ्यात मिरवताना दिसली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:01 IST2025-03-13T20:53:53+5:302025-03-13T21:01:36+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant Isha Negi Relationship Special Picture Viral Sakshi Pant Wedding | लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण...

लग्नाचा माहोल! क्रिकेटर रिषभ पंतच्या गर्लफ्रेंडची इन्स्टा स्टोरी चर्चेत, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant And Isha Negi Relationship : आयपीएल आधी भारताचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत फिल्डबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत आहे. बहिण साक्षीच्या लग्नातील त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आहेत. यात आता त्याची कथित गर्लफ्रेंड पिक्चरमध्ये आलीये. गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटर पंत आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ईशा नेगी यांच्यात प्रेमाचा खेळ सुरु आहे. ही जोडी सातत्याने एकत्रित फोटो करत नसली तरी याआधी दोघांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आलीये. कारण पंतची गर्लफ्रेंड नणंद  साक्षीच्या लग्नात अगदी तोऱ्यात मिरवताना दिसली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंतच्या गर्लफ्रेंडनं शेअर केली खास स्टोरी

Isha Negi
Isha Negi

रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात अनेक लोकप्रिय मंडळींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यात ईशा नेगीचीही झलक पाहायला मिळाली. ईशा नेगी आणि रिषभ पंत यांचा लग्नातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईशा नेगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते. गुरुवारी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती नटून थटून खास कार्यक्रमासाठी तयार झाल्याचे दिसून येते. त्यानंतर तिने इन्स्टा स्टोरीतून रिषभ पंतच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थिती असल्याची गोष्टही शेअर केली. 

Isha Negi
Isha Negi

दोघांनी याआधीच व्यक्त केलंय एकमेकांवरील प्रेम, पण...

पाच वर्षांपूर्वी रिषभ पंतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ईशा नेगीसोबतचा  फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. त्यानंतर ईशा नेगी अधून मधून पंतसोबतच्या खास फोटोसह त्याच्याबद्दलच्या मनातील भावना व्यक्त करत नात्यातील गोडवा दाखवत आली आहे. पण ही जोडी जोडी बऱ्याच दिवसांपासून एका फ्रेममध्ये दिसली नव्हती. आता पंतच्या बहिणीच्या लग्नात मिरवताना दिसल्यावर पुन्हा एकदा पंत अन् ईशा यांच्यातील प्रेमाची गोष्ट चर्चेत आली आहे.


Web Title: Rishabh Pant Isha Negi Relationship Special Picture Viral Sakshi Pant Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.