Join us

Rishabh Pant Health Update: रिषभ पंतच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी सफल, पण पायाचा एमआरआय टाळला; डॉक्टरांनी जारी केले हेल्थ बुलेटीन

मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. पंतला सर्वाधिक जखमा या डोके आणि पायाला झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 08:39 IST

Open in App

आईला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सरप्राईज देण्यासाठी जाणाऱ्या रिषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. जखमी अवस्थेत अर्धवट कारबाहेर पडलेल्या रिषभला समोरून येणाऱ्या बसचालकाने बाहेर काढले आणि पाच सहा सेकंदात गाडीने पेट घेतला. एवढ्या भीषण अपघातातून रिषभ वाचला आहे. परंतू त्याला डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

Rishabh Pant Car Accident: थरारक! बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान; रिषभ पंत आणि बसमध्ये ५० मीटरचेच अंतर; आशाच सोडलेली...मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. पंतला सर्वाधिक जखमा या डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा एमआरआय स्कॅन करण्यात आला होता. पंतची रिपोर्ट नॉर्मल आली आहे. ऋषभ पंतच्या गुडघ्याला आणि मनगटाला दुखापत झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. पाठीलाही दुखापत आहे. डोके दोन ठिकाणी जखमी आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, रिषभच्या आणखी काही चाचण्या होणार आहेत. त्याच्या घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय स्कॅनही करायचा होता. परंतू सूज असल्याने एमआरआय स्कॅन टाळण्यात आला आहे. पंतला तिथे जास्त दुखतही आहे. हे स्कॅन आज ३१ डिसेंबरला केले जाणार आहे. 

कार अपघातात रिषभ पंतच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. अनेक जखमा, कापल्या गेल्याचे व्रण आणि काही ओरखडेही आले. आता त्यांना दुरुस्त करण्यासाठी पंतची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. पंतला उजवा गुडघा आणि घोट्यात लिगामेंटची समस्या असू शकते. याच कारणामुळे मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पंतच्या गुडघ्यावरही पट्टी बांधली आहे. 

टॅग्स :रिषभ पंतअपघात
Open in App