Join us

Rishabh Pant-Isha Negi: रिषभ पंत कर्णधार होताच गर्लफ्रेंड ईशा नेगीनं शेअर केला स्पेशल मेसेज...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेची सुरुवात आजपासून होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आज पहिला ट्वेन्टी-२० सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:05 IST

Open in App

नवी दिल्ली-

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेची सुरुवात आजपासून होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आज पहिला ट्वेन्टी-२० सामना होत आहे. सर्वांना आजच्या सामन्याची उत्सुकता आहे. कारण भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृ्त्वाची धुरा २४ वर्षीय रिषभ पंतच्या खांद्यावर असणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुल याची निवड करण्यात आली होती. पण तो दुखापतग्रस्त झाल्यानं ऐनवेळी रिषभ पंतला संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रिषभ पंत कर्णधार होताच त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिनं एक स्पेशल मेसेज सोशल मीडियात शेअर केला आहे. ईशा नेगी हिनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिनं थँकफूल, ग्रेटफुल आणि ब्लेस्ड फील असं नमूद केलं आहे. रिषभ पंतला कर्णधार घोषीत केल्यानंतर ईशानं ही स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे ईशाच्या पोस्टच्या टायमिंगची आता जोरदार चर्चा सुरू आहे. 

ईशा नेगी आणि रिषभ पंत बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना डेट करत आहेत. रिषभ पंतला आपण आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं नेतृत्व करताना पाहिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यांवेळी ईशा नेगी देखील स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्याचं दिसून आलं आहे. रिषभ पंत मूळचा उत्तराखंडचा असला तरी त्याचं संपूर्ण बालपण आणि ट्रेनिंग दिल्लीत झालं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये रिषभ पंत दिल्लीकडून खेळत आला आहे. आता जेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी रिषभ पंतला मिळाली आहे तो सामना देखील दिल्लीतच होणार आहे. 

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App