भारताचा स्टार विकेट किपर बॅटर विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. ओडिशाविरुद्ध २७३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. धावफलकावर ६ धावा असताना आघाडीचे दोन फलंदाज बाद झाले. संघ अडचणीत असताना रिषभ पंतकडून मोठ्या आणि आश्वासक खेळीची अपेक्षा होती. पण २८ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि १ षटकारासह केवळ २४ धावा करून पंत बाद झाला. कर्णधाराने आपली विकेट गमावत संघाच्या अडचणीत आणखी भर घातली. शेवटी दिल्लीच्या संघाने हा सामनाही गमावला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेतही संघाबाहेर राहण्याची येणार वेळ!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्याआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धमक दाखवून वनडे संघात परतण्याची पंतला टीम इंडियाचा दरवाजा ठोठावण्याची चांगली संधी होती. पण आतापर्यंतच्या ४ सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या फ्लॉप शोमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी त्याला संघात स्थान मिळणे जवळपास मुश्किलच झाले आहे.
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
KL राहुलसह ध्रुव जुरेलच्या रुपात दोन उत्तम पर्याय
वनडे संघात केएल राहुलच स्थान जवळपास निश्चित आहे. तो विकेट मागची जबाबदारीही अगदी उत्तमरित्या बजावू शकतो. एवढेच नाही तर विकेट किपर बॅटरच्या रुपात एका बाजूला पंत अपयशी ठरत असताना दुसऱ्या बाजूला ध्रुव जुरेल आपलं नाणं खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. ही गोष्ट पंतसाठी धोक्याची घंटा ठरेल.
ध्रुव जुरेल याने ४ सामन्यात एका शतकासह दोन अर्धशतकासह दावेदारी केली आहे भक्कम
विजय हजारे ट्रॉफीत पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने या स्पर्धेत २ धावा, ७० धावा, २२ धावा आणि २४ धावा अशी कामगिरी नोंदवली आहे. त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. याउलट उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याने मागील चार सामन्यातील ३ सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद १६० ही त्याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळेच रिषभ पंतच्या तुलनेत तो सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.