Join us

Rishabh Pant Opener, Memes Viral, IND vs WI 2nd ODI: "विकेटकिपर हूँ तो फिनिशर समझें, ओपनिंग करेगा मैं"; ऋषभ पंत सलामीला येताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

राहुलऐवजी ऋषभ पंत सलामीला आल्याने सारेच चकित झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 14:43 IST

Open in App

Rishabh Pant Opener, Hilarious Memes Viral on Social Media: भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरूद्च्या दुसऱ्या वन डे सामन्यात एक अनपेक्षित चाल खेळली. वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका ही रोहितची पूर्णवेळ वन डे कर्णधार म्हणून पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात लोकेश राहुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे रोहित आणि इशान किशन यांनी ओपनिंग केली. पण दुसऱ्या सामन्यात राहुल संघात आल्यावर इशान किशनला संघाबाहेर करण्यात आले. हा बदल अपेक्षितच होता, पण राहुल संघात असतानाही रोहितसोबत चक्क ऋषभ पंतला सलामीला उतरवण्यात आलं. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. पंत ओपनिंगला आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाल्याचं दिसून आले.

एका युजरने पुष्पा स्टाईल पंतचा फोटो वापरत त्यावर लिहिलं की किपर है तो फिनिशर समझें क्या, ओपनिंग करेगा मैं. तर दुसऱ्या एका युजरने हेराफेरी चित्रपटातील फोटो वापरत आपल्या भावना मजेशीरपणे व्यक्त केल्या. पाहूया असेच काही भन्नाट मीम्स...

--

--

--

--

--

दरम्यान, ऋषभ पंतला ओपनिंग उतरवल्यानंतर त्याने मोठी खेळी करण्यास सुरूवात केली होती. पण त्याला अपयश आले. त्याने ३४ चेंडूत १८ धावा केल्या. या डावात त्याने तीन चौकार मारले. पण एका हवाई फटक्याच्या वेळी तो बाद झाला. त्याच्या आधी कर्णधार रोहित शर्माही स्वस्तात बाद झाला. रोहितने ८ चेंडूत ५ धावा केल्या. त्यामुळे आज मैदानात उतरलेली सलामी जोडी फ्लॉप ठरली.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंतमिम्ससोशल मीडिया
Open in App