आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून संघाबाहेर असलेल्या रिंकू सिंह याचीही वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या १५ सदस्यीय संघात वर्णी लागली आहे. फिनिशरच्या रुपात त्याला संधी देण्यात आल्यामुळे चाहत्यांसह रिंकू तर खुश झालाच आहे. याशिवाय रिंकूची वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात एन्ट्री झाल्यावर उत्तर प्रदेशच्या खासदार प्रिया सरोज यांची इन्स्टा स्टोरी व्हायरल होताना दिसत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिंकू सिंहच्या निवडीनंतर खासदार प्रिया सरोज यांनी असा व्यक्त केला आनंद
सपा खासदार आणि क्रिकेटर रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिंकूची भारतीय संघात कमबॅक झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. लव्हवाली इमोजीसह प्रिया सरोज यांनी भारतीय संघाच्या निवडीसंदर्भातील बीसीसीआयची पोस्ट शेअर करत रिंकूच्या टीम इंडियातील कमबॅकचा आनंद साजरा केला आहे. त्यांची ही पोस्ट दोघांमधील खास बॉन्डिंग दाखवून देणारे आहे.
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनसह रिंकूला संधी
Priya Saroj On Rinku Singh Returns तो वर्ल्ड कपच्या शर्यतीतून आउट झाल्याचे चित्र निर्माण झाले होते, पण...
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करुन दाखवत रिंकू सिंह याने फिनिशरच्या रुपात टीम इंडियातील आपले स्थान भक्कम केले आहे. टी-२० प्रकारातील आशिया कप स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. पण त्याला थेट फायनलमध्ये संधी मिळाली. पाकिस्तान विरुद्ध चौकारासह संघाला विजय मिळवून देत एक चेंडू खेळून त्याने हवा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो संघाचा भाग होता. पण घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याला संघात स्था मिळाले नाही. त्यामुळे तो वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण संघ निवडीवेळी फिनिशरच्या रुपात बीसीसीआये रिंकूवर भरवसा ठेवला. रिंकूसह त्याची होणारी पत्नीही ही बातमी ऐकूण खूश झाल्याचे दिसून आले.