उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राज्यातील गुणवंत खेळाडूंना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे वाटप करण्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा ज्याच्यावर होत्या, तो भारतीय क्रिकेट संघाचा 'फिनिशर' रिंकू सिंह चक्क गैरहजर राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस दलात आणि इतर विभागांत रिक्त पदांवर खेळाडूंची थेट नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. रिंकू सिंहची निवड 'गॅझेटेड ऑफिसर' पदासाठी झाल्याची चर्चा होती. आज लखनौमधील लोकभवनात आयोजित कार्यक्रमात रिंकूला नियुक्ती पत्र दिले जाणार होते. मात्र, रिंकू या कार्यक्रमात पोहोचू शकला नाही.
गैरहजेरीचे कारण काय?रिंकू सिंहच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा किंवा वैयक्तिक कारणांमुळे तो कार्यक्रमात येऊ शकला नाही. मात्र, सोशल मीडियावर रिंकूने 'IPL' आणि 'टीम इंडिया'तील मानधनामुळे सरकारी नोकरीला महत्त्व दिले नाही का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.
इतर खेळाडूंना मिळाले मानरिंकू गैरहजर असला तरी, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंनी या कार्यक्रमात हजेरी लावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे कौतुक करत उत्तर प्रदेश हे खेळाडूंसाठी हब बनत असल्याचे प्रतिपादन केले.
Web Summary : Rinku Singh skipped Uttar Pradesh's job offer ceremony, fueling speculation. Citing cricket commitments, his absence raises questions about prioritizing IPL earnings over a government position. Other athletes were honored.
Web Summary : रिंकू सिंह ने उत्तर प्रदेश सरकार की नौकरी की पेशकश छोड़ दी, जिससे अटकलें तेज हो गईं। क्रिकेट प्रतिबद्धताओं का हवाला देते हुए, उनकी अनुपस्थिति से सरकारी पद पर आईपीएल की कमाई को प्राथमिकता देने के बारे में सवाल उठते हैं। अन्य एथलीटों को सम्मानित किया गया।