Join us

Asia Cup 2025, IND vs PAK : बीसीसीआयला आता माघार घेता येणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण

भारत-पाक सामन्याला विरोध, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 19:55 IST

Open in App

BCCI Unable To Withdraw From Asia Cup 2025 : आशिया कप २०२५  स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. भारत-पाक यांच्यातील राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे आशिया कप स्पर्धेवर संकटाचे सावट निर्माण झाले होते. यजमानपद आपल्याकडे असताना BCCI या स्पर्धेपासून दूर राहणार, अशी चर्चा रंगली होती. पण आशियाई क्रिकेट परिषदेच्या ढाका येथील बैठकीनंतर आशिया कप स्पर्धेचा मार्ग मोकळा झालाय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारत-पाक सामन्याला विरोध, पण...

 ९ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत १४ सप्टेंबरला भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना होणार हे देखील स्पष्ट झाले आहे. आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक समोर आल्यावर सोशल मीडियावर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये,  या स्पर्धेतून माघार घ्यावी, असा  सूर उमटत आहे. पण यात आता कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भात सविस्तर 

IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया

आता BCCI ला या स्पर्धेतून माघार घेता येणार नाही, कारण...

आयएएनएसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या सूत्राने नियोजित कार्यक्रमात कोणाताही बदल होणार नाही, असे म्हटले आहे.  "बीसीसीआय आता या स्पर्धेतून माघार घेऊ शकत नाही. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. भारत या स्पर्धेचा यजमान देश आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना ठरल्याप्रमाणेच होईल." बीसीसीआयने मात्र अधिकृतरित्या या मुद्यावर कोणतही भाष्य कलेले नाही.

आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक

  • ९ सप्टेंबर  अफगाणिस्तान विरुद्ध  हाँगकाँग
  • १० सप्टेंबर  : भारत विरुद्ध यूएई
  • ११ सप्टेंबर  : बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  • १२ सप्टेंबर  : पाकिस्‍तान विरुद्ध ओमान
  • १३ सप्टेंबर  : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • १४ सप्टेंबर  : भारत विरुद्ध पाकिस्‍तान
  • १५ सप्टेंबर  : श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
  • १५ सप्टेंबर  : यूएई विरुद्ध ओमान
  • १६ सप्टेंबर  : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  • १७ सप्टेंबर  : पाकिस्‍तान विरुद्ध यूएई
  • १८ सप्टेंबर  : श्रीलंका विरुद्ध अफगानिस्‍तान
  • १९ सप्टेंबर  : भारत विरुद्ध ओमान

सुपर फोर वेळापत्रक 

  • २० सप्टेंबर, B1 विरुद्ध B2
  • २१ सप्टेंबर, A1 विरुद्ध A2 (संभावित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान)
  • २३ सप्टेंबर, A2 विरुद्ध B1
  • २४ सप्टेंबर, A1 विरुद्ध B2
  • २५ सप्टेंबर, A2 विरुद्ध B2
  • २६ सप्टेंबर, A1 विरुद्ध B1
  • २८ सप्टेंबर, फायनल
टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय