Join us  

सचिनच्याआधी या खेळाडूची जर्सी झाली आहे रिटायर

नुकतीच बीसीसीआयने मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात सचिनची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाही, जी निवृत्त झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 6:33 PM

Open in App

मुंबई : नुकतीच बीसीसीआयने मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची10 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात सचिनची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाही, जी निवृत्त झाली आहे. सचिनच्या जर्सीचा या यादीत नंबर दुसरा लागतो.ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजेसच्या जर्सीच्या नंबरला तेंडुलकरच्या जर्सीआधी निवृत्त करण्यात आले होते. फिलिप ह्युजेसचे 27 नोव्हेंबर 2014 मध्ये एका सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने निधन झाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यानंतर त्याच्या सन्मानार्थ जर्सी नंबर 63 ला निवृत्त घोषित केले होते.

काल बुधवारी बीसीसीआयने खेळाडुंच्या सहमतीने भारतीय क्रिकेट टीममधील कुठलाही खेळाडूला 10 नंबरची जर्सी दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय अनौपचारिक असल्याचं बोललं जातं आहे. बीसीसीआयच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा कुठलाही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून दिसणार नाही. 2012 मध्ये 10 नंबरची जर्सी घालून तेंडुलकर शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्तीच्या घोषणेनंतर या नंबरची जर्सी रिटायर करण्याची मागणी करण्यात आली होती. 

(आणखी वाचा : आपल्याला दुसरा सचिन तेंडुलकर नकोय का?)

27  नोव्हेंबर 2014 हा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा दिवस. त्या दिवशी शॉन अ‍ॅबॉटचा चेंडू लागल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजेसचा मृत्यू झाला होता. सिडनी क्रिकेट मैदानातील सात क्रमांकाच्या खेळपट्टीवर ही दुर्घटनेला घडली होती.   या मैदानात एकूण 10 खेळपट्या आहेत. फिलिपच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ही खेळपट्टी कायमची बाद ठरवली. मात्र, ही दुर्घटना ऑस्ट्रेलियन खेळाडू आजही विसरलेले नाहीत. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू काळ्या फितीसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :क्रिकेटसचिन तेंडूलकरआॅस्ट्रेलियादहा नंबरची जर्सी