आपल्याला दुसरा सचिन तेंडुलकर नकोय का?

जर्सीच्या नंबरमध्ये काय ठेवलंय? अनेक महान खेळाडू पेले, मॅरेडोना, झिनादीन झिदान ते सचिन तेंडुलकर या सर्वांच्या जर्सीचा नंबर 10 का?...आजही मेसी, रूनी, नेमार यांसारखे खेळाडू 10 नंबरची जर्सी मैदानात घालून उतरतात.

By Sagar Sirsat | Published: November 29, 2017 12:55 PM2017-11-29T12:55:27+5:302017-11-29T13:05:26+5:30

whatsapp join usJoin us
Do not you want another Sachin Tendulkar? | आपल्याला दुसरा सचिन तेंडुलकर नकोय का?

आपल्याला दुसरा सचिन तेंडुलकर नकोय का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: जर्सीच्या नंबरमध्ये काय ठेवलंय? मैदानावरील अनेक महान खेळाडू अगदी जगातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून ओळख असलेल्या फुटबॉलपासून ते क्रिकेटपर्यंत अनेक महान खेळाडू पेले, मॅरेडोना, झिनादीन झिदान ते सचिन तेंडुलकर या सर्वांच्या जर्सीचा नंबर 10 का?...आजही मेसी, रूनी, नेमार यांसारखे खेळाडू 10 नंबरची जर्सी मैदानात घालून उतरतात. आता याला अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी काही पण संघातला सर्वश्रेष्ठ खेळाडू 10 नंबरची जर्सी घालताना दिसतो. 10 नंबरची जर्सी घालणारा खेळाडू मैदानात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करताना दिसतो असं म्हटलं तरी वावगं ठरू नये...पण असं का याचं नेमकं उत्तर कोणाकडेही नाही. तरीही या नंबरचे अनेक चाहते आहेत. 

पेले, मॅरेडोना, झिदान, तेंडुलकरपासून आत्ताच्या मेसीपर्यंत सर्व खेळाडू वेगवेगळ्या पिढ्यांमधील महान खेळाडू आहे. हे सर्व खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरले आणि आपआपल्या जमान्यातील खेळाचे बादशाह बनले.  नुकतंच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडुंच्या सहमतीने भारतीय क्रिकेट टीममधील कुठल्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी न देण्याचा निर्णय घेतला. दुस-या शब्दांमध्ये भारतीय क्रिकेटमधून 10 नंबरची जर्सी रिटायर्ड करण्यात आली. 10 नंबरची जर्सी फक्त सचिनच्या नावे असावी, खेळाडू आणि बोर्डाकडून सचिनला देण्यात आलेला सन्मानाचं एक प्रतिक म्हणून ही जर्सी असावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 10 नंबरच्या जर्सीमुळे विनाकारण वाद निर्माण होईल आणि त्याचा सामना टीम इंडियाच्या खेळाडुंना करावा लागेल. म्हणूनच अनौपचारिकपणे जर्सी रिटायर्ड करण्याचा निर्णय घेतला. इंडिया ए साठीचे खेळाडू 10 नंबरची जर्सी घालू शकतात पण आंतरराष्ट्रीय सामन्यात ही जर्सी वापरली जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

म्हणजेच काय तर आता भारतीय क्रिकेटमध्ये आपल्याला 10 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू पाहायला मिळणार नाही. याचा अर्थ क्रिकेटमध्ये सचिननंतर दुसरा महान खेळाडू होणार नाही का? तर असं नाहीये. त्यामुळे 10 नंबरची जर्सी रिटायर्ड करण्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सचिनचा सन्मान म्हणून अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण सचिनचा सन्मान ठेवुनच काहीजण या निर्णयाच्या विरोधात आहेत. जगभरात ज्या 10 नंबरच्या जर्सीचं इतकं महत्व आहे ती जर्सी रिटायर्ड करणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू दिआगो मॅरेडोना. फुटबॉल जगतातील सर्वकालिन महान खेळाडूंमध्ये गणना होणा-या मॅरेडोनाची जर्सी अर्जेंटिनाने रिटायर्ड केली नाही, या उलट मॅरेडोनाची प्रतिमा ज्या खेळाडूमध्ये दिसली तो दिग्गज लिओनेल मेसी ही जर्सी घालून मैदान गाजवताना दिसतोय....म्हणजेच काय तर अर्जेंटिनाला त्यांचा दुसरा मॅरेडोना मिळाला. मग आपल्याला दुसरा सचिन नकोय का? हा प्रश्न या अनुषंगाने येथे उपस्थित होतोय.

Web Title: Do not you want another Sachin Tendulkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.