Join us

कुठल्याही स्थानावर फलंदाजीस सज्ज

रोहित शर्मा : निर्णय संघ व्यवस्थापनावर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 02:02 IST

Open in App

नवी दिल्ली : रोहित शर्माने कसोटी सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्या भूमिकेचा आनंद घेतला आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत संघ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार कुठल्याही स्थानावर फलंदाजी करण्याची तयारी आहे, असे मत त्याने व्यक्त केले. सिनिअर फलंदाज व कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या साथीने रोहित मोठी भूमिका बजावण्याची आशा आहे. 

रोहित म्हणाला,‘मी सर्वांना एकच बाब सांगत आहे. संघ व्यवस्थापन ज्या स्थानावर खेळण्यास सांगेल त्या स्थानावर खेळण्याची तयारी आहे. पण सलामीवीर म्हणून ते माझ्या भूमिकेत बदल करतील केव्हा नाही, हे मी सांगू शकत नाही.’रोहितच्या मते, जोपर्यंत बँगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये मी ‘स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग’ ट्रेनिंगनंतर ऑस्ट्रेलियात दाखल होईल, तोपर्यंत संघ व्यवस्थापनाने माझी भूमिका निश्चित केलेली असेल. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ