रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएस २०२५ मधील अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी अहमदाबादची खेळपट्टीवर गोलंदाज कमाल करतात की फलंदाजांची मनमानी चालते, याबाबत समोर आलेल्या आकड्यांवरून आजच्या सामन्याचा अंदाज घेऊयात.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच अनुकूल राहिली आहे. या मैदानावर अनेकदा हाय स्कोअरिंग सामने झाले. मुंबई आणि पंजाब यांच्यात झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातही असेच काही पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबईने २०० धावांचा टप्पा ओलांडूनही पंजाबने एक षटक शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. अशा परिस्थितीत आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामना देखील हाय स्कोअरिंग ठरू शकतो, अशी शक्यता आहे. या मैदानावर टॉसची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आकडेवारीनुसार, आयपीएल २०२५ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ६ सामने जिंकले आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ४३ आयपीएल सामने खेळले गेले, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २१ वेळा विजय मिळवला आहे. तर, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने २२ सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आतापर्यंत २० सामने जिंकले आहेत. तर, नाणेफेक गमावणाऱ्या संघाने संघाने २३ सामने जिंकले आहेत.
या मैदानावर सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाबने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट गमावून २४३ धावा केल्या. तर, या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या उभारण्याचा विक्रम गुजरातच्या नावावर आहे. गुजरातचा संघ आयपीएलच्या मागील हंगामात दिल्लीविरुद्ध सामन्यात ८९ धावांवर ऑलआउट झाला.
Web Title: RCB vs PBKS, IPL 2025 Final: Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Ahmedabad pitch report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.