IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!

Ambati Rayudu: आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सीएसकेच्या गोलंदाजावर भडकला. धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्याचे त्याने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 18:05 IST2026-04-06T18:01:03+5:302026-04-06T18:05:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RCB vs CSK, IPL 2026: Ambati Rayudu on Chennai Super Kings Bowlers Over Death overs and MS Dhoni | IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!

IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!

चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला असून, या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी संघाच्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या  सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत तब्बल ९७ धावा दिल्या, तर अखेरच्या षटकात ३० धावा खर्च केल्या. या खराब गोलंदाजीमुळे सामना पूर्णपणे हातातून गेला. विशेष म्हणजे, ज्या लेन्थवर गोलंदाजी करण्यात आली, त्या प्रकारच्या गोलंदाजीला सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमीच विरोध करत असत, तरीही गोलंदाजांनी त्याच चुका पुन्हा केल्या, अशा शब्दांत रायडूने संताप व्यक्त केला. 

ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना रायडू यांनी सांगितले की, सराव सत्रांमध्ये सीएसकेचे गोलंदाज अनेकदा ‘राउंड द विकेट’ गोलंदाजीचा सराव करत असत, पण सामन्यात कधीच धोनी त्यास परवानगी दिली नाही. त्यांच्या मते, डेथ ओव्हर्समध्ये हा अँगल फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरतो, कारण क्रीझच्या थोडे बाहेर उभे राहूनही फलंदाज सहज आक्रमक फटके खेळू शकतात. रायडू यांनी पुढे सुचवले की, डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी यॉर्कर्स आणि स्लोअर डिलिव्हरीसारख्या चेंडूंचा अधिक प्रभावी वापर करणे गरजेचे आहे.

सीएसकेसमोर मोठे आव्हान

सीएसकेसमोर सध्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी ही मोठी समस्या बनली आहे. अखेरच्या चार षटकांत ७८ धावा दिल्यामुळे आरसीबीला २५०/३ अशी भक्कम धावसंख्या उभारता आली. सीएसकेने लक्ष्याचा पाठलाग करताना २०० धावांचा टप्पा पार केला, मात्र ते विजयापासून खूप दूर राहिले. सीएसकेचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी संघात निवड झालेल्या स्पेन्सर जॉन्सन अद्याप संघात सामील झाला नाही. त्यामुळे जेमी ओव्हरटन वर अतिरिक्त जबाबदारी आली असून, त्यालाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. एकूणच, डेथ ओव्हर्समधील निष्काळजी गोलंदाजी आणि प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती यामुळे चेन्नईला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

सुनील गावस्कर काय म्हणाले? 

याआधीही भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सीएसकेच्या संघातील कमतरता स्पष्टपणे मांडल्या होत्या. स्पर्धेत पुढे जाताना सीएसके समोरचे सर्वात मोठे आव्हान त्यांची गोलंदाजीच ठरणार आहे, कारण प्रत्येक सामन्यात २२५-२३० धावांचा मोठा डोंगर उभारण्याचा दबाव फलंदाजांवर येत आहे, असे ते म्हणाले होते. आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सीएसकेचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी आहे. सीएसकेचा संघ त्याचा पुढील सामना ११ एप्रिलला दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.

Web Title : धोनी के कहने पर भी सीएसके के गेंदबाजों ने गलतियाँ दोहराईं: रायडू

Web Summary : आरसीबी से हार के बाद रायडू ने सीएसके के डेथ बॉलिंग की आलोचना की, धोनी के मार्गदर्शन के बावजूद बार-बार गलतियाँ दोहराईं गईं। खराब प्रदर्शन और विविधता की कमी के कारण सीएसके को भारी नुकसान हुआ।

Web Title : Rayudu slams CSK's bowlers for repeating mistakes despite Dhoni's instructions.

Web Summary : Rayudu criticized CSK's death bowling after their loss to RCB, highlighting repeated errors despite Dhoni's guidance. Poor execution and lack of variety cost CSK dearly, compounding existing bowling woes.