Join us

Harshal Patel RCB, IPL 2022: हर्षल पटेल अचानक RCBचे बायोबबल सोडून पडला बाहेर, वाचा काय आहे कारण

मुंबई विरूद्धच्या सामन्यानंतर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 13:01 IST

Open in App

Harshal Patel RCB, IPL 2022: हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने शनिवारी मुंबई इंडियन्सच्या संघाचा पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना त्यांनी मुंबईच्या संघाला १५२ धावांतच रोखले. त्यानंतर दिलेले आव्हान सहज पार करत त्यांनी यंदाच्या हंगामातील आपली विजयी लय कायम राखली. पण याचदरम्यान, एक ब्रेकिंग बातमी म्हणजे, RCBचा खेळाडू हर्षल पटेल याने अचानक बंगळुरूचा संघ सोडला. तो RCBच्या बायोबबल मधून बाहेर पडला असल्याची माहिती देण्यात आली. त्यामागचे नक्की कारण काय ते जाणून घेऊया.

RCBचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि RCBच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हर्षलच्या बहिणीचे निधन झाल्याने तो RCBच्या बायो-बबलमधून बाहेर पडला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने संघ सोडला असून तो घरी परतला आहे. तो काही दिवस घरी थांबून मग पुन्हा संघात परतणार आहे. हर्षलच्या बहिणीचा शनिवारीच मृत्यू झाला होता. तिची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती.

आरसीबीचा संघ शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यामध्ये आरसीबी संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर हर्षल पटेलला त्याच्या बहिणीच्या निधनाची बातमी मिळाली. त्यामुळे त्याने संघाचे बायोबबल सोडले. IPL शी संबंधित एका सूत्राने सांगितले की, दुर्दैवाने हर्षलला त्याच्या बहिणीच्या निधनामुळे बायो-बबल सोडावे लागले. त्याने पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी टीम बस घेतली नाही. RCBचा पुढील सामना १२ एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App