बाबो; विराट कोहलीच्या नव्या भिडूचा नादच करू नका; IPL 2021साठी RCBच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाज, Video

RCB rope in Finn Allen २१ वर्षीय एलनं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश लीगमध्ये ५१२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 02:33 PM2021-03-11T14:33:51+5:302021-03-11T14:41:05+5:30

whatsapp join usJoin us
RCB rope in Finn Allen as Josh Philippe's replacement, know his T20 stats, batting records and more | बाबो; विराट कोहलीच्या नव्या भिडूचा नादच करू नका; IPL 2021साठी RCBच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाज, Video

बाबो; विराट कोहलीच्या नव्या भिडूचा नादच करू नका; IPL 2021साठी RCBच्या ताफ्यात धडाकेबाज फलंदाज, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश फिलिप ( Josh Philippe) यान इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून RCBन न्यूझीलंडचा उद्योन्मुख खेळाडू फिन एलन ( Finn Allen) याला करारबद्ध केलं आहे. एलनला आयपीएल लिलावात कुणीच खरेदी केले नाही. २० लाख ही त्याची बेस प्राईज होती.  आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल

२१ वर्षीय एलनं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश लीगमध्ये ५१२ धावा चोपल्या आहेत आणि त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यानं ५६ चौकार व २५ षटकार खेचले आहेत. फिन एलननं न्यूझीलंडकडून १२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं न्यूझीलंडच्या सुपर स्मॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे.  पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

RCBनं केलं ट्विट
 ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिपनं २०२०च्या आयपीएल पर्वातून पदार्पण केलं आणि पाच सामन्यांत त्यानं ७८ धावा केल्या. जोश फिलिपनं माघार घेतल्यानंतर RCBनं ट्विट केलं की,''जोश फिलिपनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे सांगताना आम्हाला दुःख होतेय. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आघाडीचा फलंदाज फिन एलन याला करारबद्ध केले आहे.''

फिन एलनचा रेकॉर्ड
फिन एलननं १२ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३४३ धावा केल्या आहेत. २० लिस्ट ए क्रिकेटध्ये ५०१ धावा त्याच्या नावावर आहेत आणि १२८ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 
 

पाहा व्हिडीओ...


Web Title: RCB rope in Finn Allen as Josh Philippe's replacement, know his T20 stats, batting records and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.