RCB च्या विजयानंतर अनन्या बिर्लानं ‘धुरंधर’ गाणं वाजवलं; काव्या मारनला टोमणा? सोशल मीडियावर रंगली चर्चा

काव्या मारनसह RCB च्या ब्युटीनंही बजावली आपली नवी ड्युटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 02:53 IST2026-03-29T02:45:08+5:302026-03-29T02:53:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RCB Owner Ananya Birla Cooking SRH Kavya Maran In Her Own Style Insta Story Goes Viral After Royal Challengers Bengaluru won by 6 wkts IPL 2026 Opener vs Sunrisers Hyderabad | RCB च्या विजयानंतर अनन्या बिर्लानं ‘धुरंधर’ गाणं वाजवलं; काव्या मारनला टोमणा? सोशल मीडियावर रंगली चर्चा

RCB च्या विजयानंतर अनन्या बिर्लानं ‘धुरंधर’ गाणं वाजवलं; काव्या मारनला टोमणा? सोशल मीडियावर रंगली चर्चा

RCB Owner Ananya Birla vs SRH Kavya Maran Trendian On Social Media : रजत पाटीदारच्या 'धुरंधर' लूकप्रमाणेच त्याच्या नेतृत्वाखालील गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आयपीएलच्या १९ व्या हंगामाची सुरुवात अगदी धमाकेदार अंदाजात केली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय दोन्ही संघासाठी चीअर करणाऱ्या दोन ब्युटी क्वीन्स चर्चेत आल्या आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

काव्या मारनसह RCB च्या ब्युटीनंही बजावली आपली नवी ड्युटी

नेहमीप्रमाणे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत होती. दुसऱ्या बाजूला RCB च्या संघाची मालकीण अनन्या बिर्ला हिने संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर एन्ट्री मारत सर्वांचे लक्षवेधून घेतले. सामन्याआधी संघाला चीअर करतानाची खास पोस्ट शेअर करणाऱ्या अनन्या बिर्ला हिने विक्रमी विजयानंतर इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून विजयाचा आनंद व्यक्त केला.

IPL 2026 : बॅटल ऑफ आयपीएल क्वीन्स! SRH च्या काव्या मारनसमोर RCB च्या नव्या मालकीणीनं लुटली मैफील

एका बाजूला अनन्या बिर्लानं भाव खाल्ला, दुसऱ्या बाजूला काव्या मारन ट्रोल, कारण...

अनन्या बिर्लानं 'धुरंधर २' मधील खास म्युझिकसह एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची स्टोरी ही सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारनला टोमणाच आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. IPL मध्ये याआधी काव्या मारन ही नॅशनल क्रशच्या टॅगसह चर्चेत असायची. पण यावेळी सोशल मीडियावर ती ट्रोल होताना दिसत आहे. नवी ब्युटी दिसली म्हणून हे सगळं घडलेले असे नाही तर त्याला कारण आहे ते म्हणजे इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या द हंड्रेड लीगमध्ये तिने पाकिस्तानी खेळाडूवर लावलेली बोली. SRH च्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नेटकरी काव्या मारनला त्या मुद्यावरुनही ट्रोल करताना दिसत आहेत.  

SRH कडून ईशानची शानदार खेळी व्यर्थ! विराट- देवदत्त पडिक्कलचा धमाका

ईशान किशन याने सलामीच्या सामन्यात ८० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या जोरावरच SRH च्या संघाने २०० पार धावसंख्येची लढाई केली होती. दोन्ही संघाकडून त्याने केलेली खेळी सर्वोच्च ठरली. पण विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकासह देवदत्त पडिक्कलने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधीच सोनं करताना केलेली दमदार अर्धशतकाच्या जारोवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विक्रमी विजय नोंदवला.

Web Title : RCB की जीत पर अनन्या बिर्ला ने काव्या मारन को ताना मारा?

Web Summary : अनन्या बिर्ला ने 'धुरंधर' गाना बजाकर RCB की जीत का जश्न मनाया, जिससे SRH की काव्या मारन को ताना मारने की अफवाहें उड़ीं। मारन को अतीत के खिलाड़ी विकल्पों के कारण ट्रोल किया जा रहा है, जबकि RCB सफलता का आनंद ले रही है।

Web Title : Ananya Birla celebrates RCB victory, taunts Kavya Maran with song?

Web Summary : Ananya Birla celebrated RCB's victory by playing 'Dhurandhar', sparking rumors of a taunt towards SRH's Kavya Maran. Maran faces trolling due to past player choices, while RCB enjoys success.