"आम्हाला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय..."; RCB प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव

RCB bengauru stampede: IPL 2025 विजयानंतर बंगळुरूत झालेल्या विजयी रॅलीतील चेंगराचेंगरीत ११ जणांचा झालेला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:57 IST2025-06-09T20:55:08+5:302025-06-09T20:57:02+5:30

whatsapp join usJoin us
rcb approaches karnataka high court bengaluru stampede case ipl 2025 | "आम्हाला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय..."; RCB प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव

"आम्हाला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय..."; RCB प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयात घेतली धाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB bengauru stampede, IPL 2025: बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ३ जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जचा पराभव करून RCB पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनला. विजयोत्सव साजरा करण्यासाठी ४ जून रोजी बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान, प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात, पोलिसांनी RCB मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड (RCSL) विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याविरुद्ध आता RCSL ने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

'आम्हाला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले'

RCSL चा असा युक्तिवाद आहे की त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्रँचायझीने या कार्यक्रमाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले होते, की प्रवेश पास मोफत असला तरी त्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. त्यांना या प्रकरणात गोवले जात आहे. याशिवाय, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) द्वारे आयोजित या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारी कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कनेही त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पुरेसा पोलिस बंदोबस्त नव्हता, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. या प्रकरणात, बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कचे इव्हेंट मॅनेजर आणि KSCA व्यवस्थापन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा युक्तिवाद काय?

गुन्हा दाखल झाल्यानंतर, या प्रकरणाचा आता सीआयडीमार्फत तपास व चौकशी केली जात आहे. याशिवाय, आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल हेड निखिल सोसाळे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे, तर उच्च न्यायालयाने सध्या पोलिसांना केएससीए अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. या प्रकरणात, बेंगळुरू पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांचे अधिकारी ४ जून रोजी सकाळी ५:३० वाजेपर्यंत स्टेडियमभोवती ड्युटीवर होते. या दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली नाही.

सोशल मीडियावरील पोस्टमुळे परिस्थिती आणखी बिकट

पोलिसांनी लिहिलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की परवानगी नसतानाही, केएससीए, आरसीबी आणि डीएनए यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि कार्यक्रम सुरू ठेवला. याशिवाय, कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय, ४ जून रोजी आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया आणि वेबसाइटवर विजयोत्सव परेडची घोषणा केली आणि चाहत्यांना त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. जेव्हा टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर ही बातमी पसरली, तेव्हा आम्ही (पोलिसांनी) आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि त्यांना सुरक्षा आणि आवश्यक व्यवस्था करण्याची विनंती केली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की आरसीबीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.

Web Title: rcb approaches karnataka high court bengaluru stampede case ipl 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.