Ravindra Jadeja's Instagram profile disappears as Sanju Samson swap deal : इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या आगामी हंगामाला अजून उशीर असला तरी संघ बांधणीसाठी अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. मिनी लिलावापूर्वी १५ नोव्हेंबरला सर्व १० फ्रँचायझी संघांना रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. या रिटेन रिलीजच्या खेळाआधी CSK च्या संघातील स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा सातत्याने चर्चेत आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, संजूला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सजा संघ जड्डूला ट्रेड विंडोच्या माध्यमातून राजस्थानच्या संघात पाठवायला तयार आहे. त्याच्यासोबत सॅम कुरेनलाही संघ ट्रेड करणार असल्याचे बोलले जाते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या डीलची चर्चा रंगत असताना जड्डू 'इन्स्टा'वरुन झाला 'गायब'
IPL Trade Window च्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आगामी हंगामाआधी मोठी डील चर्चेत आहे. त्यात आता या डीलचा प्रमुख भाग असलेला रवींद्र जडेजा आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. जड्डू हा मैदानातील कामगिरीशिवाय सोशल मीडियावरही सक्रीय असतो. पण CSK चा संघ त्याला 'खिडकी'तून (IPL Trade Window) बाहेर काढण्याची चर्चा रंगत असताना हा गडी आता सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवरुन गायब झाला आहे. ही गोष्ट ट्रेड विंडोसंदर्भात रंगणाऱ्या चर्चेशी जोडली जात आहे.
संजूला मोठी डिमांड! जड्डू-सॅम या दोन स्टार खेळाडूंच्या बदल्यात CSK–RR मध्ये होणार मेगा ट्रेड?
पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातूनच मारली होती IPL मध्ये एन्ट्री
रवींद्र जडेजानं २००८ च्या पहिल्या वहिल्या हंगामात वयाच्या १९ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या संघाकडूनच IPL मध्ये पदार्पण केले होते. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील संघाने हा हंगाम गाजवला होता. २०१० मध्ये कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी जड्डूवर एका वर्षाची बंदी झाली. त्यानंतर २०१२ पासून तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. आता पुन्हा तो ज्या संघाकडून सुरुवात केली त्या संघाकडून खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगत आहे.
... तर तो पुन्हा राजस्थानच्या ताफ्यातून खेळताना दिसेल
२००८ आणि २००९ या दोन हंगामात रवींद्र जडेजासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्रत्येकी १२-१२ लाख रुपये मोजले होते. २०११ मध्ये तो ४.३७ कोटींसह कोच्ची टस्कर्स केरळा संघाकडून खेळताना दिसला. गत हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला १८ कोटी रुपयांसह रिटेन केले होते. जर ट्रेड डील झाली तर याच रक्कमेसह तो राजस्थानकडून खेळताना दिसेल.