Ravichandran Aswhin on Babar Azam Form : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सुपर संडेची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. २३ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या ताफ्यात मात्र जाम टेन्शन आहे. यामागचं कारण स्टार बॅटर बाबर आझमचा खराब फॉर्म हे आहे. पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीनं या स्पर्धेची सुरुवात केली. पण या सामन्यात घरच्या मैदानात पाक संघावर ६० धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. या सामन्यात बाबर आझमनं अर्धशतक झळकावले. पण तरीही त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थिीत करण्यात येत आहे. भारत-पाक यांच्यातील मेगा लढतीआधी आता आर. अश्विनन यानेही पाक स्टारची फिरकी घेतलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्धशतकी खेळीनंतरही बाबर होतोय ट्रोल, अश्विननंही घेतली फिरकी
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकानंतरही बाबर आझम ट्रोल होतोय. त्याच्या खेळीवर आता भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन यानेही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलंय. बाबर आझम ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता तशी बॅटिंग १९९० च्या जमान्यात केली जायची, अशा शब्दांत अश्विननं बाबरला टोला मारलाआहे.
बाबरच्या बॅटिंगवर काय म्हणाला अश्विन?
अश्विन याने आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाबरच्या कामगिरीवर भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, 'इंटेंट कुठं होता, घरी ठेवलेला का? बाबर मैदानात उतरला त्यावेळी त्याला कोणता फटका कसा मारायचा याबद्दल त्यानं थोडाही विचार केला नव्हता, असे त्याची बॅटिंग बघितल्यावर वाटले. बॅटिंग करताना त्याने ना स्क्वेअर ऑफ द विकेट फटक मारला ना रिव्हर्स स्वीप किंवा स्वीप शॉट ट्राय केला. त्याने जे इनिंग खेळली तशी बॅटिंग १९९० च्या दशकात व्हायच. बाबरची बॅटिंग बघणं मुश्किल होते. मी बाबरचा खूप मोठा चाहता आहे. पण कधी कधी आपण आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळतो त्यावेळी गोष्टी अवघड होतात. कोणत्याही खेळाडूची प्रतिष्ठा ही टीमपेक्षा मोठी नसते, असे म्हणत आर. अश्विनने बाबरची खेळी स्वार्थी होती, असा ठपका मारला आहे."
बाबरची न्यूझीलंड विरुद्धची कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या लढतीत बाबर आझमनं ६० चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. बाबरनं जर सुरुवातीपासून चांगल्या धावगतीनं धावा केल्या असत्या तर पाकिस्तानच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली नसती, अशा प्रतिक्रिया त्याच्या खेळीवर उमटत आहेत. अश्विनलाही अगदी तेच वाटते.