नवी दिल्ली - अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन आश्विनचा वन डे आणि टी-२० संघात समावेश असायला हवा, असे मत माजी कर्णधार आणि निवड समितीचे प्रमुख राहिलेले दिलीप वेंगसरकर यांनी रविवारी व्यक्त केले.
आश्विन हा मॅचविनर गोलंदाज असल्याने त्याचा वन डे आणि टी-२० संघात समावेश असायलाच हवा, यावर वेंगसरकर यांनी भर दिला. काही दिवसांआधी कोहलीने आश्विनच्या पुनरागमनाबाबत प्रतिक्रिया देत ‘वॉशिंग्टन सुंदरच्या समावेशामुळे आश्विनसाठी दारे बंद झाल्याचे’ म्हटले होते. कोहलीचे मत असे होते की, ‘एकसारखे दोन खेळाडू संघात असू शकत नाहीत. वॉशिंग्टन सुंदर फॉर्ममध्ये नसेल किंवा जखमी असेल तरच आश्विनला स्थान मिळू
शकेल, असे त्याने सांगितले होते. वेंगसरकर मात्र कोहलीच्या मताशी सहमत नाहीत. ते म्हणाले, ‘आश्विनसोबत वॉशिंग्टनची तुलनाच होऊ शकणार नाही.’