रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'

वनडे क्रिकेट कंटाळवाणे, अश्विनने मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:40 IST2026-01-01T19:38:02+5:302026-01-01T19:40:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ravichandran Ashwin On ODI Cricket Not Survive After 2027 World Cup And Virat Kohli And Rohit Sharma Retirement | रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'

रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'

भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांने वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधताना अश्विन याने २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटचा हा फॉरमॅट टिकेल की नाही, याबाबत शंका वाटते, असे मत मांडले. एवढेच नाही तर हा फॉरमॅट टिकवण्यासाठी त्याने फिफाचा फॉर्म्युला आजमावण्याचा सल्लाही दिला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


विराट-रोहितनंतर वनडेत रस उरणार नाही?

सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन भारतीय दिग्गज फक्त वनडेमध्ये सक्रीय आहेत. २०२७ पर्यंत ही जोडी वनडे फॉरमॅटमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. दोघे एकाच प्रकारात खेळत असल्यामुळे वनडेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर या दोघांनी निवृती घेतली तर वनडेत चाहत्यांना रस उरणार नाही असे वाटते का? असा प्रश्न आर. अश्विनला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, "आज लोक वनडे क्रिकेट पाहतात कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर या फॉरमॅटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटेल.”  त्यामुळे ICC ने वेळीच बदल केले नाहीत, तर वनडे क्रिकेट केवळ इतिहास जमा होईल, अशा शब्दांत त्याने या फॉरमॅटचं भवितव्य धोक्यात असल्याचे बोलून दाखवले.

Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?

वनडे क्रिकेट कंटाळवाणे, अश्विनने मांडले परखड मत

अश्विन म्हणाला की, सध्याच्या घडीला वनडे क्रिकेट खूपच कंटाळवाणे झाले आहे. १० ते ४० षटकांच्या काळात सामन्यातील रसच निघून जातो. पॉवर प्लेच्या खेळानंतर फलंदाज सहजपणे प्रत्येक षटकात चौकार मारतो. गोलंदाजांसाठी विकेट घेणं अवघड होते. वनडे क्रिकेट हळूहळू आपली चमक गमावत असून ते ‘स्लो डेथ’कडे वाटचाल करत आहे, असे परखड मत आर अश्विन याने मांडले. 

फीफा मॉडेल आजमावण्याचा सल्ला

जर वनडे क्रिकेट टिकवायचे असेल तर  फुटबॉलच्या FIFA मॉडेलचा अवलंब करावा लागेल, असा सल्लाही आर. अश्विन याने दिला आहे. तो म्हणाला की,  फुटबॉलमध्ये  क्लब लीग  सुरू असतात आणि वर्ल्ड कप चार वर्षांतून एकदाच खेळवला जातो. अगदी त्याचपद्धतीने  क्रिकेटमध्येही द्विपक्षीय वनडे मालिका बंद करुन चार वर्षातून एकदाच वर्ल्ड कप खेळवला पाहिजे. हा प्रयोग वनडे टिकवणारा आणि या फॉरमॅटमधील क्रिकेटची उत्सुकता वाढवणारा ठरेल, असे अश्विनने म्हटले आहे.

Web Title : अश्विन: रोहित-विराट के बाद वनडे क्रिकेट को फीफा फार्मूला बचा सकता है

Web Summary : अश्विन को रोहित और विराट के बाद वनडे क्रिकेट के पतन का डर है। उन्होंने द्विपक्षीय श्रृंखलाओं को बंद करके, हर चार साल में विश्व कप के साथ फीफा मॉडल अपनाने का सुझाव दिया है, ताकि रुचि को पुनर्जीवित किया जा सके और इसकी 'धीमी मौत' को रोका जा सके।

Web Title : Ashwin: FIFA formula can save ODI cricket after Rohit-Virat retire

Web Summary : Ashwin fears ODI cricket's decline post-Rohit and Virat. He suggests adopting FIFA's model with World Cups every four years, discontinuing bilateral series, to revive interest and prevent its 'slow death'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.