कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक 

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून समोर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 23:11 IST2017-10-19T23:09:57+5:302017-10-19T23:11:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ravi Shastri, the world's richest cricket coach in terms of earning | कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक 

कमाईच्या बाबतीत रवी शास्त्री जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक 

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांना तीन महिन्यांसाठी बीसीसीआयने 1 कोटी 20 लाख रुपयांएवढं मानधन देऊ केलं होतं. परंतु आता बीसीसीआय रवी शास्त्रींना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिक मानधन देत असल्याचं वृत्त CricInfo या वेबसाइटनं दिलं आहे.

विशेष म्हणजे रवी शास्त्रींना मिळणारं हे मानधन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मानधनापेक्षाही जास्त आहे. विराट कोहली वर्षभरात 6 कोटी 50 लाख रुपये कमवतो. शास्त्रींनंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना वर्षाकाठी 3 कोटी 57 लाख रुपयांहून अधिक मानधन मिळतं.

शास्त्री यांनी यंदा जुलैमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केलं होतं. त्यांना 18 जुलै ते 16 ऑक्टोबर या कालावधीसाठी 1 कोटी 20 लाख 87 हजार 187 रुपयांचे मानधन देण्यात आलं असून, बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावरही याची माहिती दिली होती. तसंच भारताबाहेर झालेल्या स्पर्धांचे एकूण मानधन स्वरुपात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 57 लाख 88 हजार 373 रुपयांचे मानधनही देण्यात आले होते. बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं रवी शास्त्री यांना वर्षाला 7 कोटींहून अधिकचं पॅकेज मिळतंय. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी इतक्याच मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं शास्त्रींना वर्षाकाठी 7 कोटींचं पॅकेज देण्याचं ठरवल्याची माहिती समोर आली आहे. शास्त्रींना जास्तीत जास्त साडेसात कोटींपर्यंत मानधन देण्यात येईल, त्यापेक्षा अधिक नसेल, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं स्पष्ट केलं होतं. 
तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत
शास्त्री हे तिसऱ्यांदा टीम इंडियासोबत अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. याआधी 2007 मध्ये बांगलादेश दौऱ्याच्या वेळी ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्यानंतर ऑगस्ट 2014 ते जून 2016 या कालावधीसाठी संघाचे संचालक राहिले. याच काळात भारताने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत करीत मालिका जिंकली होती. 2015चा विश्वचषक आणि 2016च्या टी-20 विश्वचषकातदेखील संघाने उपांत्य फेरी गाठली होती.

Web Title: Ravi Shastri, the world's richest cricket coach in terms of earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.