Join us

रवि शास्त्री यांनी रणवीर सिंहसोबत केला जबरदस्त डान्स, डान्स टिप्ससाठी मानले रणवीरचे आभार

Ravi Shastri dance with Ranveer Singh : रवि शास्त्री अभिनेता रणवीर सिंगसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ते रणवीरसोबत डान्स करताना दिसत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 15:33 IST

Open in App

जगभरात नवं वर्ष २०२२ चं स्वागत जल्लोषात आणि वेगवेगळ्या अंदाजात करण्यात आलं. भारतीय क्रिकेट टीमचे माजी कोच रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनीही २०२२ चं स्वागत खास पद्धतीने केलं. त्यांनी अभिनेता रणवीर सिंगसोबतचा (Ranveer Singh) एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ते रणवीरसोबत डान्स करताना दिसत आहेत. 

व्हिडीओ शेअर करत रवि शास्त्री यांनी रणवीरला डान्स टिप्स शिकवण्यासाठी धन्यवादही दिले आहेत.  त्यांनी लिहिलं की, २०२२ मध्ये असं येणं आवडलं. रणवीर सिंग डान्स टिप्स देण्यासाठी धन्यवाद. २०२२ हे वर्ष सगळ्यांसाठी शानदार, निरोगी आणि प्रेरक वर्ष व्हावं.

शास्त्री यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ ८३ सिनेमाच्या प्रीमिअर नाइटचा आहे. ज्यात दोघे जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. २४ डिसेंबरला ८३ हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज होण्याआधी सेलिब्रिटी आणि मीडियासाठी स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमलाही बोलवण्यात आलं होतं.

८३ हा सिनेमा रिलीज झाला असला तरी त्याला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. कदाचित कोरोनामुळे प्रेक्षक थिएटरला जात नाहीयेत. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही फार काही कमाल दाखवू शकला नाही.  

टॅग्स :रवी शास्त्रीरणवीर सिंग
Open in App