Join us  

IPL 2021: टीम इंडियात जडेजाला 'सर' म्हटलं जात नाही, कोच रवी शास्त्रींनी केला नव्या नावाचा खुलासा

IPL 2021: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) संघावर मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 5:03 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्जनं (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) संघावर मात केली. सीएसकेच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजाचं मोठं योगदान राहिलं. जडेजानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही बाबतीत आपली जबरदस्त कामगिरी दाखवत आरसीबीच्या नाकी नऊ आणले. जडेजानं आधी फलंदाजीत २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी साकारली. यात अखेरच्या षटकात त्यानं तब्बल ३७ धावा कुटल्या. त्यानंतर गोलंदाजीत केवळ १३ धावा देऊन आरसीबीच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद केलं. यात जडेजानं ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स यांच्या विकेट्सचा समावेश आहे. याशिवाय अफलातून क्षेत्ररक्षण करत डॅन ख्रिश्चन याला धावचीत केलं. (ravi shastri reaveals the nick name of ravindra jadeja ipl 2021 csk vs rcb)

कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

जडेजाच्या या अष्टपैलू योगदानानंतर सामनावीराच्या पुरस्कारानं त्याचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, सोशल मीडियात पुन्हा एकदा रवींद्र जडेजा 'सर' नावाची उपाधी का दिली जाते याचं सर्वत्र कौतु केलं गेलं. जडेजानं त्याला दिल्या जाणाऱ्या सर जडेजा या उपाधीचं महत्वच जणू आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सर्वांना दाखवून दिलं. पण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक नवा खुलासा केला आहे. रवींद्र जडेजाच्या कामगिरीचं कौतुक तर त्यांनी केलंच पण जडेजाच्या नव्या नावाचा खुलासा शास्त्री यांनी केला आहे. 

'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEOमहेंद्रसिंग धोनीनं रवींद्र जडेजा याला एकदा सहज सर जडेजा असं म्हटलं होतं. त्यानंतर जडेजाला सर्वच सर जडेजा या नावानेच ओळखू लागले. पण भारतीय संघाचे प्रशिक्षक यांनी आरसीबी विरुद्ध सीएसकेच्या सामन्यानंतर एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी जडेजाचा फोटो ट्विट केला आहे आणि "म्हणूनच आम्ही त्याला गॅरी जडेजा असं म्हणतो. जबरदस्त प्रतिभावान खेळाडू", असं कॅप्शन शास्त्री यांनी दिलं आहे. जडेजाच्या नावाआधी 'गॅरी' या उपाधीचा देखील शास्त्री यांनी खुलासा केला आहे. गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिजचे एक महान अष्टपैलू क्रिकेटपटू होते. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये गॅरी सोबर्स यांचं नाव घेतलं जातं. 

होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुककोहलीनंही केलं होतं जडेजाचं कौतुक''बॅट, बॉल अन् क्षेत्ररक्षणात रवींद्र जडेजानं केलेल्या कामगिरीचा मला आनंद आहे. दोन महिन्यानंतर तो भारतीय संघाकडून खेळताना दिसेल आणि तुमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू फलंदाजीत दमदार कामगिरी करतो हे सुखावणारं आहे'', असं विराट कोहली म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२१रवींद्र जडेजारवी शास्त्रीचेन्नई सुपर किंग्स