IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक जबरदस्त कर्णधार तर आहेच पण यष्टीमागील त्याची कामगिरी देखील तितकीच अफलातून राहिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:29 PM2021-04-26T15:29:04+5:302021-04-26T15:33:10+5:30

whatsapp join usJoin us
Hindi me nahi bol sakta MS Dhoni cheeky comment leaves Ravindra Jadeja and Suresh Raina in splits | IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO

IPL 2021: 'अब हिंदी में नहीं बोल सकता', स्टम्पमागे धोनीच्या कॉमेंट्रीनं एकच हशा पिकला; पाहा VIDEO

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक जबरदस्त कर्णधार तर आहेच पण यष्टीमागील त्याची कामगिरी देखील तितकीच अफलातून राहिली आहे. स्टम्पमागून धोनी गोलंदाजाला नेहमी आपल्या सूचना देत असतो तर कधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसतो. धोनी करत असलेल्या सूचना स्टम्पमधील माईकमधून आपल्याला याआधीही अनेकदा ऐकता आल्या आहेत. 

सॅल्यूट! १९ वर्षीय खेळाडूनं कोरोना लसीकरणासाठी खर्च केली करिअरची सर्व कमाई

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यातही महेंद्रसिंग धोनी स्पम्पच्या मागून गोलंदाजांना सूचना देत होता. यावेळी धोनीचं एक वाक्य स्टम्प माईकमधून थेट कॉमेंट्री बॉक्सपर्यंत ऐकू गेलं आणि एकच हशा पिकला. 

कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा, शोएब अख्तरनं दिला सल्ला

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. एबी डीव्हिलियर्ससमोर जडेजा गोलंदाजी करत असताना धोनीनं स्टम्पमागून हिंदीतून जडेजाला सूचना देणं सुरू ठेवलं होतं. त्याचा फायदा देखील होताना दिसला आणि जडेजानं डीव्हिलियर्सला बाद केलं. पण डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर हर्षल पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यामुळे धोनीनं "अब हिंदी में नहीं बोल सकता'', असं जडेजाला सांगितलं आणि धोनीचा हा आवाज स्टम्प माइकमधून थेट कॉमेंट्री बॉक्सपर्यंत ऐकू गेला. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये एकच हशा पिकला. इतकंच नव्हे, तर धोनीच्या बाजूला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा सुरेश रैना आणि गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा देखील धोनीच्या कमेंटवर हसू लागले होते.

परदेशी फलंदाज खेळत असताना हिंदीतून सल्ला किंवा सूचना गोलंदाजाला दिल्या की त्या फलंदाजाला फारशा कळत नाहीत. त्यामुळे खेळपट्टीवर परदेशी फलंदाज खेळत असताना मुद्दाम हिंदीतून सूचना देत असतो. पण भारतीय फलंदाज मैदानात आला की हिंदीतून सूचना देता येत नाहीत. 
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जनं आरसीबी विरुद्धचा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आहे.

"धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित

धोनीचा संघ आठ गुणांसह आता पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात तब्बल ६९ धावांनी विजय प्राप्त केला. या सामन्यात रवींद्र जडेजाची कामगिरी अतिशय महत्वाची ठरली. जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही भूमिकेत जबरदस्त कामगिरीची नोंद केली. जडेजानं सामन्यात २८ चेंडूत ६२ धावांची खेळी साकारली. तर गोलंदाजीत केवळ १३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. यासोबतच जडेजानं केलेल्या अफलातून हिटवर डॅन ख्रिश्चन धावचीत झाला होता. 

Web Title: Hindi me nahi bol sakta MS Dhoni cheeky comment leaves Ravindra Jadeja and Suresh Raina in splits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.