IPL 2021, RCB vs CSK : होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक

IPL 2021 : CSK Vs RCB  T20 Live Score Update चेन्नई सुपर किंग्सच्या ४ बाद १९१ धावांचा पाठलाग करताना बंगलोरला ९ बाद १२२ धावा करता आल्या. CSKनं हा सामना ६९ धावांनी जिंकला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 08:02 PM2021-04-25T20:02:55+5:302021-04-25T20:03:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, RCB vs CSK : Ravindra Jadeja took the game away from us, you can probably say one guy beat us, Say Virat Kohli  | IPL 2021, RCB vs CSK : होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक

IPL 2021, RCB vs CSK : होय, एकट्या रवींद्र जडेजानं आम्हाला पराभूत केलं; CSKच्या खेळाडूचं विराट कोहलीकडून कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 CSK Vs RCB live match score updates Mumbai : २८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला. चेन्नई सुपर किंग्सच्या ४ बाद १९१ धावांचा पाठलाग करताना बंगलोरला ९ बाद १२२ धावा करता आल्या. CSKनं हा सामना ६९ धावांनी जिंकला. रवींद्र जडेजा एकटा भिडला, विराट कोहलीच्या RCBला पुरून उरला; विक्रमांचा धो धो पाऊस पाडला!

फॉर्मात परतलेल्या ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली या दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. ऋतुराज ( ३३) माघारी परतला.  रैनानं १८ चेंडूत २४ धावा केल्या.  फॅफनं ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५० धावा केल्या. जडेजानं २८ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६२ धावा चोपल्या. हर्षल पटेलनं टाकलेल्या २० व्या षटकात जडेजानं ३६ धावा चोपल्या, तर एक नो बॉलमुळे आयपीएलमधील हे सर्वात महागडे ( ३७ धावा) षटक ठरले. IPL 2021 latest news, CSK Vs RCB IPL Matches ६, ६, ७nb, ६, २, ६, ४; रवींद्र जडेजाचा अखेरच्या षटकात RCBवर 'प्रहार'! Watch Video

प्रत्युत्तरात विराट कोहली व देवदत्त पडीक्कल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ३ षटकांत ४४ धावा चोपल्या. सॅम कुरननं RCBला मोठा धक्का देताना कर्णधार विराट कोहलीला ( ८) माघारी पाठवले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं RCBचा फॉर्मात असलेला सलामीवीर देवदत्त पडीक्कल ( ३४) याला बाद केलं. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या रवींद्र जडेजानं गोलंदाजीतही RCBवर वर्चस्व गाजवले.  जडेजानं ४ षटकांत एक निर्धाव षटकासह १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इम्रान ताहीरनं १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. RCBला ९ बाद १२२ धावा करता आल्या अन् CSKनं ६९ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.   

विराट कोहली काय म्हणाला?
या पराभवाकडे तुम्ही सकारात्मक नजरेनं पाहायला हवं. योग्य वेळी हा पराभव झाला आणि आपल्या संघात काय नेमकं चुकतंय हे कळलं. हा आमच्यासाठी सकारात्मक फिडबॅक आहे. या सामन्यात आम्ही पकड घेतली होती, परंतु दारूण पराभव झाला. रवींद्र जडेजानं त्याच्या कौशल्याच्या जोरावर आमच्याकडून सामना हिरावून घेतला. त्यानं एकट्यानं आम्हाला पराभूत केलं, असं तुम्ही म्हणू शकता,''असे विराट म्हणाला.

''बॅट, बॉल अन् क्षेत्ररक्षणात रवींद्र जडेजानं केलेल्या कामगिरीचा मला आनंद आहे. दोन महिन्यानंतर तो भारतीय संघाकडून खेळताना दिसेल आणि तुमचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू फलंदाजीत दमदार कामगिरी करतो हे सुखावणारं आहे,''असेही विराट म्हणाला.

Web Title: IPL 2021, RCB vs CSK : Ravindra Jadeja took the game away from us, you can probably say one guy beat us, Say Virat Kohli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.