Join us

आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध

शतकी खेळीनंतर त्याच्यासमोर काय आव्हाने असतील, यावर भाष्य करत शास्त्रींनी वैभवला सावधानतेचा इशाराच दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:45 IST

Open in App

Ravi Shastri Advice For Vaibhav Suryavanshi : आयपीएलच्या १८ व्या हंगामात १४ वर्षाच्या पोरानं इतिहास रचलाय. यंदाचा हंगाम त्याच्या पदार्पणासह वादळी शतकीमुळे ऐतिहासिक ठरला आहे. १३ व्या वर्षी १ कोटी १० लाखाची लागलेली बोली, १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारत दाखवेला ट्रेलर अन् तिसऱ्याच सामन्यात शतकासह ब्लॉकबस्टर शो  देत वैभव सूर्यवंशीनं आपली खास छाप सोडलीये. एका बाजूला शतकी खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला माजी क्रिकेटर आणि लोकप्रिय समालोचक रवी शास्त्री यांनी या युवा क्रिकेटरला मोलाचा सल्ला दिला आहे. शतकी खेळीनंतर त्याच्यासमोर काय आव्हाने असतील, यावर भाष्य करत शास्त्रींनी वैभवला सावधानतेचा इशाराच दिला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वैभव सूर्यंवशीसंदर्भात काय म्हणाले शास्त्री? 

रवी शास्त्री यांनी आयसीसी रिव्हूमध्ये संजना गणेशनसोबत क्रिकेटसंदर्भातील गप्पा गोष्टी केल्या. यावेळी त्यांनी १४ वर्षीय वैभव सूर्यंवंशी याच्यासमोर आता कोणतीही आव्हाने असतील यावर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्याच्या घडीला वैभव सूर्यंवशी हा खूपच युवा आहे. त्याला फक्त खेळू द्या. या वयात काही वेळा अपयशही पदरी येईल. या परिस्थितीचा तो कसा सामना करतोय तेही पाहावे लागेल. हे  एक चॅलेंजच असेल. आता तो बॅटिंगला येईल त्यावेळी गोलंदाज त्याला आखूड टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयोग करतील. पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या बॅटरसोर आता कोणताही गोलंदाज  दया-माया दाखवणार नाही. ते त्याला भेदक माराच करतील, असे सांगत शास्त्रींनी वैभव सूर्यंवशीला सावध केल्याचे दिसते. 

आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)

वैभवची कडक बॅटिंग अन् चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

वैभव सूर्यंवशी याने लखनौ विरुद्धच्या पदार्पणातील सामन्यात शार्दुल ठाकूरला पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपल्या फलंदाजीतील तेवर दाखवले होते. या सामन्यात आवेश खानलाही त्याने आसमान दाखवल्याचे पाहायला मिळाले. आता गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने धमाका केला. ३५ चेंडूत शतक झळकावत अनेक या पोरानं अनेक विक्रम प्रस्थापित केले. १४ वर्षांच्या पोराची बॅटिंग बघून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्यामुळे राजस्थानच्या संघाचा सामना बघणारा प्रेक्षकवर्गही निश्चितच वाढलाय. आगामी सामन्यात वैभव सूर्यंवशीची बॅटिंग बघायला क्रिकेट चाहते अधिक उत्सुक असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटरवी शास्त्री