"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट

शतकी खेळीनंतर नेमकं काय म्हणाला संजू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 01:28 IST2026-04-12T01:16:43+5:302026-04-12T01:28:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ravi Shastri Is Sanju Samsons Lucky Charm He Revealed After Scoring Century vs Delhi Capitals In IPL 2026 | "आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट

"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट

 Who Is Sanju Samsons Lucky Charm : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील १८ व्या सामन्यात संजू सॅमसनची बॅट तळपली. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात त्याने येलो जर्सीतील पहिले आणि आयपीएल कारकिर्दीतील चौथे शतक साजरे केले. यंदाच्या हंगामातील तो पहिला शतकवीर ठरला. ५२ धावांवर निसंकाने त्याचा झेल सोडला. नशीबाची साथ मिळाल्यावर संजून आपली पॉवर दाखवून शतकी डाव खेळला. या खास खेळीनंतर संजू सॅमसन याने रवी शास्त्रींसमोर 'लकी चार्म'संदर्भात केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शतकी खेळीनंतर नेमकं काय म्हणाला संजू?

पहिल्या तीन डावात दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरलेल्या संजूनं चौथ्या सामन्यात तिहेरी आकडा गाठला. शतकी खेळीनंतर मिड इनिंग ब्रेकमध्ये संजू सॅमसन याने माजी क्रिकेटर आणि समालोचक यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या. यावेळी तो शास्त्रींना उद्देशून म्हणाला की, "मला वाटतं तुम्ही माझ्यासाठी लकी आहात. सर कृपया प्रत्येक सामन्यासाठी तुम्ही नक्की यावे." आपल्या फॉर्मबद्दल तो पुढे म्हणाला की,  फॉर्म कितीही चांगला असला तरी देशासाठी जिंकलेल्या सामन्यानंतर अपयशानंत मनात कुठेतरी शंका निर्माण होते. आक्रमक अंदाजात सुरुवात करण्यापेक्षा सुरुवातीला मैदानात टिकून राहण्याची बेसिक गोष्ट फॉलो केली. त्याचा फायदा झाला, असे त्याने म्हटले आहे.  

Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)

आयुष म्हात्रेसोबत फलंदाजी करण्याचा अनुभव भारी होता

खेळपट्टीबद्दल तो म्हणाला की, "पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेल गोलंदाजी करत होता त्यावेळी चेंडू थांबून येत होतो. त्यामुळे फलंदाजी करणं अवघड होते. पण जसा खेळ पुढे सरकला तशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल झाली. आयुष म्हात्रेसोबत फलंदाजी करण्याचा अनुभव भारी होता. आम्ही दोघांनी धावफलकावर अधिकाधिक धावा लावण्याचं ठरवलं होते. त्यात आम्ही यशस्वी ठरलो.", ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.

सॅमसनने केली चौकार षटकारांची 'बरसात'

आयपीएल कारकिर्दीत संजू सॅमसन याने ज्या दिल्लीच्या संघाकडून पहिले शतक झळावले त्या संघाविरुद्ध नव्या फ्रँचायझीकडून शतकी डाव साधताना संजून षटकार चौकारांची 'बरसात' केल्याचे पाहायला मिळाले.  ५६ चेंडूतील ११५ धावांच्या नाबाद खेळी त्याने १५ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचले.  

Web Title : संजू सैमसन का शतक: भाग्य, रोमांस और रवि शास्त्री का 'लकी चार्म'

Web Summary : संजू सैमसन ने एक भाग्यशाली अवसर के बाद अपने आईपीएल करियर का चौथा शतक बनाया। उन्होंने रवि शास्त्री को अपना 'लकी चार्म' बताते हुए हर मैच में उनकी उपस्थिति का अनुरोध किया। सैमसन ने बेसिक्स पर टिके रहने पर जोर दिया और आयुष म्हात्रे के साथ अपनी साझेदारी की सराहना की, साथ ही 15 चौके और 4 छक्के लगाए।

Web Title : Sanju Samson's Century: Luck, Romance, and Ravi Shastri's 'Lucky Charm'

Web Summary : Sanju Samson scored his IPL career's fourth century after a lucky reprieve. He credited Ravi Shastri as his 'lucky charm,' requesting his presence at every match. Samson emphasized sticking to basics and praised his partnership with Ayush Mhatre, while smashing 15 fours and 4 sixes.