Join us

विराटच्या बॉटल कॅप चॅलेंजमध्ये रवी शास्त्रींची समालोचकाची भूमिका

सध्या सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 13:09 IST

Open in App

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसह शिखर धवनने देखील हे चॅलेंज पूर्ण केले होते. त्यातच आता भारताचा कर्णधार विराट कोहली देखील बॉटल कॅप चॅलेंजमध्ये सामील झाला आहे. त्याने सोशल मीडियावर 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करुन हे चॅलेंज पूर्ण केले आहे. 

तसेच क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीला रिव्हर्स शॉट्स खेळताना फारच कमी वेळा दिसून येतो, मात्र विराटने रिव्हर्स शॉट खेळत बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा समालोचक करतानाचा आवाज देखील या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :विराट कोहलीभारतयुवराज सिंगशिखर धवन