रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. मिडलसेक्स संघाकडून खेळताना त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यामध्ये ‘मॅन ऑफ दि मॅच’चा किताब पटकावला. मिडलसेक्स संघाचा युथ विंग संघाबरोबर सामना झाला होता.
स्पर्धेत मिडलसेक्स संघातून खेळताना अविराज याने ३४ चेंडूमध्ये ४२ धावा काढल्या. त्यामध्ये ७ चौकारांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजी करताना नऊ षटकात केवळ ३६ धावा देऊन दोन बळी बाद केले. अविराज याने क्षेत्ररक्षण करतानाही चमकदार कामगिरी केली. त्याने दोन अप्रतिम झेल घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.
अविराज याच्या ऑल राऊंड परफॉर्मन्सचा विचार करत त्याला ‘मॅन ऑफ दि मॅच’चा किताब देण्यात आला. अविराज याच्या कामगिरीबद्दल मिडलसेक्स संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अविराजच्या लेगस्पिन गाेलंदाजीचे विशेषतः गुगलीचे कौतुक केले. तसेच त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचीही दखल घेतली.
Web Title: Ratnagiri son Aviraj Anil Gawade won the Man of the Match award in his very first match while playing for Middlesex in a county tournament in England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.