Rashid Khan Says He Used Bullet Proof Car In Afghanistan Reveals The Reason : क्रिकेटच्या मैदानात आपली खास छाप सोडणारे क्रिकेटर अलिशान लाइफ स्टाइलमुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटी झाल्यावर रुबाबात मिरवणाऱ्या क्रिकेटरर्सची चर्चाही होती. पण या वलायत वावरताना त्यांच्यावर काही मर्यादीही येतात. आपल्याला हवे त्या ठिकाणी अगदी मोकळेपणाने फिरणं त्यांच्यासाठी मुश्किलचं होऊन बसते. हीच गोष्ट अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशीद खान याने इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनसोबतच्या खास कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. यावेळी राशीद खानने अफगाणिस्तानमध्ये मी बुलेटप्रुफ कारशिवाय बाहेरच पडू शकत नाही, असेही सांगितले. करामती खान बुलेटप्रुफ कार वापरतो हे ऐकून पीटरसन आश्चर्यचकित झाला. मग त्याने त्यामागचं कारण विचारल अन् अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटरनंही त्यावर स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊया राशीद खानच्या बुलेटप्रुफ कारसंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राशीद खान- केविन पीटरसन यांच्यातील संवाद
पीटरसन याने आपल्या खास शोमध्ये राशीद खानशी गप्पा गोष्टी केल्या. यावेळी इंग्लंडच्या माजी क्रिकेटरनं राशीद खानला विचारले की, “तू काबूलच्या गल्लीबोळांत मोकळेपणाने फिरू शकतोस का?” यावर राशीद खान याने थेट नाही असं उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, “मी अफगाणिस्तानच्या गल्लीबोळांत खुलेआम फिरू शकत नाही. माझ्याकडे बुलेटप्रूफ कार आहे.” हे ऐकून केविन पीटरसन आश्चर्यचकित झाला. त्यानंतर त्याने पुन्हा प्रश्न विचारला की, "काबूलमध्ये तुझ्याकडे बुलेटप्रूफ कार का आहे?” यावर राशीद म्हणाला की, “सुरक्षेसाठी ते गरजेचे आहे. अफगाणिस्तानामध्ये हे सामान्य आहे. इथं अनेकांकडे बुलेटप्रूफ कार असते."
"ती माझी लग्नाची बायको; आम्ही...." क्रिकेटरनं सांगितली व्हायरल फोटोमागची खरी गोष्ट
क्रिकेटरसाठी बुलेटप्रूफ कार स्टेटस सिम्बॉल किंवा लक्झरी वस्तू नाही, तर...
राशीद खानसाठी बुलेटप्रूफ कार ही स्टेटस सिम्बॉल किंवा लक्झरी वस्तू नाही, तर ती वैयक्तिक सुरक्षेसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. अफगाणिस्तान क्रिकेटरचे हे वक्तव्य अफगाणिस्तानमधील अस्थिरता आणि सुरक्षिततेचा धोका अधोरेखित करणारे आहे. त्याने बुलेटप्रुफ कारचा किस्सा शेअर केल्यावर इंग्लंडचा क्रिकेटर आवाक झाल्याचे पाहायला मिळाले.
क्रिकेटच्या मैदानात खास कामगिरी
राशीद खान हा अफगाणिस्तान क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटर आहे. एवढेच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये त्याने आपली खास छाप सोडली आहे. लेगस्पिनरने अफगाणिस्तानसाठी ६ कसोटी, ११७ वनडे आणि १०८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यामध्ये अनुक्रमे ४५, २१० आणि १८२ विकेट्स घेतल्या आहेत.