Join us

करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न

राशिदसह त्याच्या अन्य ३ भावांचे लग्न एकाच मांडवात उरकण्यात आल्याचे समजते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 10:02 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात चेंडू फिरवणाऱ्या राशिद खान (Rashid Khan)  याने आयष्यातील प्रेमाच्या खेळात रंग भरण्यासाठी चाहत्यांना दिलेला शब्द फिरवला आहे. जोपर्यंत अफगाणिस्तानच्या संघ वर्ल्ड कप जिंकत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असा शब्द अफगाणिस्तान स्टार क्रिकेटरनं आपल्या चाहत्यांना दिला होता. २०२० मध्ये दिलेले हे वचन बाजूला ठेवून त्याने लग्न उरकून टाकले आहे.

करामती खानसह तीन भावांचे एकाच मांडवात दणक्यात झालं लग्न; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

राशिद खान ३ ऑक्टोबरला काबूल येथे पख्तून परंपरेनुसार, लग्नबंधनात अडकला. राशिदसह त्याच्या अन्य ३ भावांचे लग्न एकाच मांडवात उरकण्यात आल्याचे समजते.  राशिद खानच्या रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात अफगाणिस्तानच्या अनेक खेळाडूंची झलक दिसून येते. राशिद खाननं अगदी दणक्यात लग्न केल्याचे फोटो आणि व्हिडिओतून दिसून येते. 

कोण आहे त्याची बेगम? ती करते काय?

अफगाणिस्तान स्टार क्रिकेटरची बेगम कोण? ती करते काय? यासंदर्भातील माहिती अजून गुलदस्त्यातच आहे. पण जी माहिती समोर येतीये, त्यानुसार जवळच्या नातेसंबंधातील तरुणीला त्याने आपल्या आयुष्याची पार्टनर म्हणून निवडलं आहे.

अफगाणिस्तानच्या संघानं वर्ल्ड कप जिंकला नाही, पण  

अफगानिस्तानच्या संघाने भलेही वर्ल्ड कप जिंकला नसेल, पण आशियाई संघाने मागील दोन आयसीसी इवेंटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. भारतात रंगलेल्या  वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभवाचा धक्का दिला होता. याशिवाय अमेरिका आणि वेस्टइंडीज येथील टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांची कामगिरीही उल्लेखनिय राहिली. अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता.  या कामगिरीसह या संघाने अनेक चाहत्यांची मनं मात्र जिंकली.

क्रिकेट जगतात राशिदचा जलवा

राशिद खान याने आपल्या फिरकीची जादू दाखवत क्रिकेटच्या मैदानात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २६ वर्षीय राशिद खान अफगाणिस्तानच्या संघाचा कणा तर आहेच. याशिवाय तो क्रिकेट जगतातील वेगवेगळ्या लीगमध्येही सहभाग घेताना दिसून येते. भल्या भल्या फलंदाजांना फिरकीवर नाचायला लावणाऱ्या राशिद खानला करामती खान असंही म्हटलं जाते. अफगानिस्तानसाठी तिन्ही प्रकारात त्याने ३७६ विकेट्स घेतल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ६१३ विकेट्सची नोंद आहे. 

टॅग्स :ऑफ द फिल्डअफगाणिस्तानव्हायरल फोटोज्